Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहशतवादाचा विध्वंसक चेहरा ओसामा बिन लादेनचा अंत

मनोज पोलादे
ND
जागतिक महासत्तेच्या तोर्‍यात मिरवणार्‍या अमेरिकेचे आर्थिक महासत्तेचे केंद्र वर्ल्ड ट्रेड सेंटर क्षणार्धात नेस्तानाभूत करूण ओसामा बिन लादेनने दहशतवादाचा विध्वंसक चेहारा दाखवला होता. अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून दहशतवादाचे साम्राज्य चालवणार्‍या लादेनला अमेरिकेने अखेर संपवले. मात्र लादेन संपला म्हणून दहशतवाद संपला काय? संपूर्ण जग आजही दहशतवादाच्या काळ्या छायेत वावरत आहे.



११ सप्टेबर २००१
मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर विमान हल्ल्याने क्षणार्धात कोसळल्याबरोबर लादेनची दहशत जगभरातल्या घराघरात पोहचली. राजकीय व आर्थिक हितासाठी जगभरात हस्तक्षेप करून लष्करी कारवाई करणार्‍या अमेरिकेवर दहशतवाद पहिल्यांदाच उलटला होता. स्वहितासाठी दहशतवादास खतपाणी घालणार्‍या अमेरिकेस पहिल्यांदाच दहशतवादी चव चाखावी लागली होती. जागतिक महासत्ता या हल्ल्याने कावरीबावरी झाली आणि लादेनला जिवंत किंवा मृत पकडण्याची सिंहगर्जना राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी केली. दहशतवादात होरपळलेल्या देशांची सहानूभूती प्राप्त झालेल्या अमेरिकेने 'दहशतवादाविरूद्ध जागतिक महाआघाडी' उभारली. लादेन अफगाणिस्ताना लपला असल्याने सीमारेषेस लागून पाकिस्तानला या आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न करताना त्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले . मात्र दहशतवादाचा पुरस्कर्ता दहशतवाद संपवत नसतो, हे त्यांना उशिरा कळले. तोपर्यंत पाक मलयी खाउन चूकला होता.

लादेनचा उदय
अफगाणिस्तानातील १९७९ ते १९८९ या संघर्षाच्या दशकात इस्लामिक कट्टरवादाचे बीजरोपण झाले. देशात १९७८ मध्ये रशियाच्या समर्थनाने साम्यवादी राजवट आली मात्र ती पूर्णपणे प्रस्थापित होऊ शकली नाही. रशियन अधिपत्याखालील सरकार सत्तेत कायम रहावे, यासाठी १९८९ मध्ये रशियन फौजा अफगाणिस्तानाच उतरल्या. या घटनेस सार्वभौमत्वावरील आक्रमण ठरवण्यात येऊन त्याविरूद्ध जिहाद छेडण्यात आला. 'पवित्र युद्धात -जिहाद'मध्ये जगभरातील मुस्लिम युवक सामिल झाले. खासकरून मध्य पूर्वेतून मोठ्या प्रमाणात युवक आले, यामध्ये ओसामा बीन लादेनचाही समावेश होता. लादेनने १९८० मध्ये अफगाणिस्तानात पाय ठेवला तेव्हा तो २३ वर्षांचा युवक होता. त्याने लवकरच संघटनेत प्रगती करत सूत्रे हाती घेतली आणि जिहादसाठी प्रचंड पैसा आणि शस्त्रास्‍त्रे उभी केली. अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्धाचा हा अखेरचा कालखंड होता. रशियाचा पराभव करण्यासाठी अमेरिकेने येथील इस्लामिक कट्टरवादास तन-मन-धनाने मदत केली आणि ओसामाचा उदय झाला.

आणि अस्त
शेवटी स्वत:चे गुप्तहेरखाते व सॅटेलाइट यंत्रणांच्या साहय्याने वर्षानुवर्ष लादेनचा पाठलाग केल्यानंतर पाकिस्तानातील एबोटाबाद येथे अमेरिकन लष्कराने त्यास घेरून यमसदनी पाठवले. २ मे २०११ रोजी लादेनचा अंत झाला आणि अमेरिकेची शपथ पूर्ण झाली. यावेळी तो ५४ वर्षांचा होता. अल-कायदाचा सफाया आणि लादेनच्या शोध मोहिमेने अमेरिकेस अफगाण युद्धाच्या खाईत लोटले. येथील तालिबानी राजवट संपृष्टात आणली. इतके केल्यानंतरही लादेन सापडला तो पाकिस्तानातील शहरात. यामुळे दहशतवादविरोधी मोहिमेत अमेरिकेस सहाय्य करण्याच्या पाकच्या वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महासत्तेच्या शपथपूर्तीसाठी तब्बल दहा वर्ष लागल्याने प्रचंड राष्ट्रभीमानी अमेरिकन जनता या घटनेचा आनंद उत्स्फूर्तपणे साजरा करू शकली नाही. अमेरिकेसहित जगभरातील देशांनी लादेनच्या पतनावर आनंद व्यक्त केला. याचसोबत अल-कायदा सहित पाकिस्तानातील काही दहशतवादी संघटनांनी घटनेचा बदला घेण्याची डरकाळी फोडली. दहशतवादाचा चेहरा लोपला म्हणून प्रवृत्ती संपणार नाही, संघटन संपणार नाही. आणि जोपर्यंत दहशतवाद संपणार नाही तोपर्यंत मानवता हतबल होऊन असहाय्य भासत राहिल!

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

हैदराबादमध्ये मनमोहन सिंग यांची प्रतिमा बसवणार, रेवंत रेड्डींची माजी पंतप्रधानांना 'भारतरत्न' देण्याची मागणी

नववर्षापूर्वी पुण्यात मोठी कारवाई, एक कोटी रुपयांची दारू जप्त, नऊ जणांना अटक

LIVE: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नितीश राणेंवर जोरदार टीका केली

केरळला मिनी पाकिस्तान म्हणाले नितीश राणेंना द्वेष मंत्रालयाचे मंत्री करा, संतापले अबू आझमी

दिल्ली आणि काश्मीरला जोडणाऱ्या 5 नवीन आधुनिक रेल्वे सुरू होणार

Show comments