suvichar

Batata Puri बटाटा पूरी

Webdunia
गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (07:36 IST)
साहित्य :-
२ मोठे बटाटे, उकडलेले, १/२ कप साबुदाणा, 5 मिरच्या, १/४ कप चिरलेली कोथिंबीर, १/२ टिस्पून जिरे, ३ टेस्पून शेंगदाणा कूट, १ टिस्पून जिरेपूड, २ टेस्पून शिंगाडा पिठ, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल.
 
कृती :-
१/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घाला. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.
 
मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मीठ घालून बारीक करा. पाणी घालू नये. शिजवलेले बटाटे किसून घ्या. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवा. 
 
तेल तापत ठेवा. प्लास्टिकवर तेलाचा हात लावून प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापा आणि मध्यभागी बोटाने भोक पाडा. पुरी तेलात टाकल्यावर झार्‍याने अजिबात पलटू नये अशाने ती तुटते. त्यावेळी झार्‍याने अलगद तेलात बुडवावी. छान ब्राऊन रंग आल्यावर काढून घ्या. गरमागरम चटणीबरोबर सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

केस गळणे थांबवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शॅम्पूऐवजी रीठाने केस धुवा

पोट आणि हृदय मजबूत ठेवायचे असेल, तर २४ तासांचा उपवास सुरू करा, फायदे जाणून घ्या

फक्त ३ पदार्थांत बनवा झणझणीत नारळ-टोमॅटो चटणी

जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

वारंवार पाय सुन्न पडतात? शरीरात असू शकते या गोष्टीची कमतरता

पुढील लेख
Show comments