Festival Posters

उपवासाचा डोसा

Webdunia
साहित्य : तीन लहान वाट्या वरई, एक लहान वाटी साबुदाणा, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ., 
चटणीसाठी : एक वाटी खोवलेले ओले खोबरे, एक मिरची,  चवीनुसार साखर, लिंबू, मीठ. 
भाजीसाठी : तीन बटाटे उकडून, चमचाभर शेंगदाण्याचे कूट, मिरच्या बारीक चिरून, तेल, जिरे. 
 
कृती : रात्री वरीचे तांदूळ आणि साबुदाणा नीट धुऊन वेगवेगळे भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते बारीक वाटून घेऊन एकत्र करावे. चवीनुसार मीठ आणि साखर घालून तीन तास झाकून ठेवावे. डोसे करतेवेळी नॉनस्टिक तव्यावर वाटीने डोसे घालावेत. 
खोवलेले खोबरे, हिरवी मिरची मिक्‍सरमधून बारीक करावे. त्यात चवीनुसार साखर, मीठ व लिंबू घालून चटणी तयार करावी. भाजी करताना बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. भांड्यात तेल घालून त्यात जिऱ्याची फोडणी करावी. नंतर त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या घालून त्यात बटाटे व शेंगदाण्याचे कुट घालून भाजी तयार करावी. बटर, हिरवी चटणी आणि बटाट्याच्या भाजीबरोबर सर्व्ह करावेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

त्वचेसाठी सूर्यफूल बियाणे फायदेशीर आहे वापरण्याची पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात कोणत्या वेळी वॉक करणे चांगले आहे, सकाळी 5 किंवा संध्याकाळी 7

1 जानेवारीपासून फिटनेस संकल्प घेऊन या योगासनांचा सराव सुरू करा

नाश्त्यासाठी बनवा चविष्ट असे मिक्स डाळीचे अप्पे पाककृती

डाळ भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पुढील लेख
Show comments