Dharma Sangrah

वडील नावाचं आभाळ असतंच की डोक्यावर

Webdunia
रविवार, 19 जून 2022 (16:48 IST)
आभाळास एका वाक्यात काय बांधावे,
आपल्या वरती असलेल्या छत्र छायेस काय समबोधा वे! 
वडील नावाचं आभाळ असतंच की डोक्यावर,
आश्वासक छत्र मायेचं, असतं की आपल्या वर,
कधीही पोरकं करत नाही हे आपल्यास,
सतत देतच राहतो, हाच त्याचा ध्यास,
माता धरित्री समान, अन पिता आपलं आभाळ,
दोघेही मिळून करतात आपला सांभाळ,
अशी ही आभाळ माया असावी लागते प्रत्येकावर,
बोलून दाखवले नाही त्यांनी तरी प्रेम असते साऱ्या वर,
मुकं रडते बर हे आभाळ कधी कधी,
पण व्यक्त होत नाही ते धरित्री परी,
होतात यातना त्यांस ही खूप ,सहन करतो,
हसत हसत येणारे आव्हान तो पेलतो,
स्वतः स काय हवंय ते विसरून जातो,
कुटुंब म्हणजेच श्वास त्याचा, तो तेच जगतो,
बोलबाला होतं नाही त्याच्या करण्याचा खूप,
कठोरपणा च बिरुद असतं न मागे,म्हणून तो चूप,
पण आम्ही नाही विसरणार, मोल आपल्या आभाळच,
धरा परी प्रिय तो आम्हास, हेच फळ आमचं!
....अश्विनी थत्ते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

इस्लामाबादमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची गोळ्या घालून हत्या

डोनाल्ड ट्रम्पच्या सुरक्षेत मोठी चूक, जेवणाच्या वेळी गोळीबार, राष्ट्राध्यक्षांना सुरक्षितपणे बाहेर काढले

महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने महसूल सहायकाला अटक केली

LIVE: महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

पुढील लेख
Show comments