Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेंगशुईनुसार हवा शयनकक्ष

Webdunia
WD
जीवनाचा तिसरा भाग हा झोपण्यातच व्यतित होणे हे मानवी जीवनातील सत्य आहे. प्रत्येक व्यक्ती वर्षातील चार महिने झोपेत काढतो. याचा अर्थ प्रत्येकाच्या जीवनात शयनकक्ष हा अविभाज्य घटक आहे. कारण 'ची' या उर्जेचा जागे असताना किंवा झोपेतही प्रभाव पडतो.

झोपेत असतान ा ' ची' चा नकारात्मक प्रभाव पडला, तर शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. शयनकक्ष हे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचे स्थान असते. कारण आपण दिवसभर काम करून याच ठिकाणी आराम करतो. वैवाहिक सुख देखिल याच ठिकाणी उपभोगतो. मुलेदेखील या खोलीत स्वतः:ला सुरक्षित समजतात.

शयनकक्षेचे दा र
शयनकक्षाच्या दारात कोणताही अडथळा नको. घरातील 'ची'चा प्रवाह या खोलीत अडथळ्याशिवाय होणे अत्यंत
गरजेचे असते. या मार्गात कोणत्याही प्रकारचे सामान ठेवू नये. या खोलीत कमी सामान असेल तर एक लहान आरसा टांगा. त्यामुळे खोली मोठी असल्याचा भास निर्माण होईल. या खोलीला एकच दार हवे.

शयनकक्षेतील पलंगाचे स्था न
NDND
या खोलीत पलंगाचे स्थान महत्त्वाचे असते. 'ची'चा प्रभाव सकारात्मक ठेवण्यासाठी पलंगाचे स्थान लक्षात घ्या.
हल्ली वेगवेगळ्या आकाराचे पलंग बाजारात दिसतात. पण फेंगशुईनुसार पलंग साधा हवा. पलंग गोलाकार
किंवा कोन असले असाही चालेल. जास्त कोन असतील तर त्यावर झालर लावता येऊ शकते. 'ची'चा प्रवाह व्यवस्थित नसेल तर झोप न लागणे किंवा व्यक्तिगत संबंध दुरावण्याची शक्यता असते.

आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी पलंग दक्षिण, पूर्व भागात ठेवा. लैंगिक सुखाचा आनंद उपभोगण्यासाठी पलंगाची दिशा उत्तरेस असू द्या. मुलांच्या खोलीतही पलंगाची दिशा विचार करूनच ठेवा. मुलांमध्ये आत्मविश्वास कमी असेल तर पलंगाची दिशा पूर्वेस करा. शिक्षण क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्यासाठी उत्तर-पूर्व दिशा ठरवा. उत्तर दिशेस पलंग ठेवला तर मुले शांत आणि उत्साही राहतात. त्याचप्रमाणे त्यांना शांत झोप येते.

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

आरती गुरुवारची

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

आरती बुधवारची

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

Show comments