रशियात खेळल जात असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 'अ' गटाच्या साखळी सामन्यात उरूग्वेने यजमान रशिाचा 3-0 असा पराभव केला.
या विजयासाह उरूग्वेने 'अ' गटात पहिले स्थान घेतले आहे. पहिल्या सामन्यात उरूग्वेने इजिप्तचा पराभव केला होता. दुसर्या सामन्यात त्यांनी सौदी अरेबियाला नमविले होते. सोमवारी रशियाला नमवून उरूग्वेने 'अ' गटातील तिन्ही साखळी सामने जिंकून नऊ गुणांसह आघाडी घेतली आहे.
यजमान रशियाने सौदी अरेबियाला पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. त्यानंतर त्यांनी इजिप्तचाही पराभव करून पुढची फेरी निश्चित केली होती. काल त्यांचा पराभव झाला तरीही रशियाने सहा गुणांसह याच गटातून दुसरे स्थान मिळविले आहे. दोन्ही संघांनी पुढची बाद फेरी गाठली आहे.
सोवारी या दोन्ही संघामध्ये खेळले गेलेल्या साखळी लढतीत लुईस सुआरेजने फ्री किकवर गोल केला. त्यानंतर डेनिस चेरीशेव्ह याने रशियाकडून आत्मघाती स्वयंम गोल केला. 90 व्या मिनिटास कबानीने तिसरा गोल करून उरूग्वेला 3-0 असा विजय मिळवून दिला. यजमान रशियाचा साखळी सामन्यातील हा पहिला पराभव ठरला.
उरूग्वेने मात्र एकही सामना गामवलेला नाही. दीएगो लेक्सॉल्ट याचा फटका रशियाच्या चेरीशेव्हला लागून जाळीत गेला. त्यामुळे हा स्वयंम गोल ठरला. एवढ्यावरच भागले नाही रशियाच्या अडचणी आणखी वाढल्या. रशियाचा खेळाडू इगोर स्मोलनिकोव्ह याला 36व्या मिनिटास पिवळे कार्ड दाखविण्यात आले व त्याला मैदानाबाहेर जावे लागले. रशियाला उर्वरित वेळेत दहा खेळाडूंवर खेळावे लागले. सुआरेजने दहाव्या मिनिटाला पहिला गोल केला व 26 व्या मिनिटाला दुसरा गोल झाला.