Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘मसान’चा ट्रेलर रिलीज

Webdunia
सोमवार, 29 जून 2015 (10:17 IST)
रिचा चढ्ढा आणि श्वेता त्रिपाठी स्टारर ‘मसान’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमधून स्पष्ट दिसते, की सिनेमा दोन कथांवर आधारित आहे. एका देवी नावाच्या तरुणी आपल्या फेलो स्टुडंट पियूषसोबत हॉटेलमध्ये जाते आणि पोलीस त्याला अलिल कृत्यांचा आरोपी सांगत अटक करतो. भ्रष्ट पोलीस देवीवर जबरदस्ती करून या आरोपांना कबूल करायला लावतात आणि तिचे म्हणणे रेकॉर्ड करतात. नंतर पोलीस या टेपद्वारे मिश्र देवी आणि तिचा पती विद्याधर पाठक (संजय मिश्र) यांना ब्लॅकमेल करतात आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी मोठय़ा रकमेची मागणी करतात.
 

दुसरी कथा, लोअर कास्टच एका तरुणाची (विक्की कौशल) आहे. तो गंगा घाट (बनारस)च्या किनार्‍यावर राहतो आणि मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करतो. एक दिवशी दीपकची भेट एका उच्च जातीय तरुणीशी (श्वेता त्रिपाठी) होते. हळू-हळू दोघांमध्ये जवळीक वाढत जाते. मात्र दोघांची जात त्याच्या प्रेमात अडथळा बनते. दोन्ही कथा कोण-कोणत्या वळणावरून जातात आणि त्यांचा शेवट कसा होतो. या सर्व गोष्टी सिनेमा रिलीज झाल्यानंतर कळतील. अलीकडेच 68 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाची स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. सिनेमाला दोन स्पेशल कॅटागरीमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. ‘मसान’ला पहिला पुरस्कार फेेडरेशन इंटरनॅशनल प्रेस सिनेमॅटोग्राफीक इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटीक्स (एफआईपीआरईएससीआई) श्रेणीमध्ये मिळाला होता. त्यानंतर सिनेमाला अन्सर्टेन रिगार्ड सेक्शनमध्ये प्रॉमिसिंग फ्यूचर अँवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. नीरज घायवनच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात आलेला हा सिनेमा यावर्षी 24 जुलैला रिलीज होणार आहे. रिचा चढ्ढा, श्वेता त्रिपाठी, संजय मिश्र आणि विक्की कौशलशिवाय पंकज त्रिपाठी आणि विनीत कुमारसुध्दा सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

Show comments