Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Movie Review: 'डियर जिंदगी'

Webdunia
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (15:57 IST)
धर्मा प्रॉडक्शन आणि रेड चिलीजच्या बॅनरमध्ये आणि गौरी शिंदे यांच्या डायरेक्शनमध्ये बनलेले चित्रपट 'डियर जिंदगी' सिनेमाघरांमध्ये  रिलीज झाले आहे. जाणून घेऊ कसे आहे हे चित्रपट ...
 
कथा ...
चित्रपटाची कथा कायरा (आलिया भट्ट)ची आहे आणि तिने सिनेमेटोग्राफीचा कोर्स केला आहे व लहान लहान जाहिरातींना डायरेक्ट करत असते. कायराची इच्छा असते की तिने लवकरच एक डायरेक्टरम्हणून चित्रपट केले पाहिजे, पण कथेत थोडे ट्विस्ट येतो. काही प्रश्नांच्या उत्तरांसाठी ती दिवसभर लढत असते. कथेत ती वेळेवेळे वर काही लोक जसे प्रोड्यूसर रघुवेन्द्र (कुनाल कपूर), होटेलियर सिड (अंगद बेदी) आणि सिंगर रूमी (अली जफर) येतात ज्यांच्यासोबत कायरा थोडा वेळ घालवते. पण अचानक एक दिवस तिची भेट थेरेपिस्ट जग (शाहरुख खान)शी होते, आणि त्याच्या गोष्टी कायराला फार पसंत पडतात. डॉक्टर जग कायराच्या शोधात तिची मदत करेल का? जीवनाशी निगडित ज्या प्रश्नांचे उत्तर ती शोधत आहे ते तिला मिळतील का? याची माहितीतर तुम्हाला थिएटरमध्ये गेल्यावरच कळेल.  
 
डायरेक्शन...
गौरी शिंदे यांनी एकदा परत कमालीचे डायरेक्शन केले आहे. 'इंग्लिश-विंग्लिश' नंतर हे गौरी शिंदे यांचे डायरेक्टरम्हणून दुसरे चित्रपट आहे. चित्रपटाची कमजोरी याची समयावधी आहे. 149 मिनिट अर्थात 2.29 तासाच्या या चित्रपटात एडिटिंगची आवश्यकता होती. लांब स्क्रीनप्लेमुळे तुमचा इंटरेस्ट एका वेळेनंतर जाऊ लागतो आणि डोक्यात एकच विचार येतो की चित्रपट केव्हा समाप्त होईल. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीसोबत बॅकड्रॉप कमालीचा आहे.  
 
स्टारकास्टची परफॉर्मेंस...
आलिया भट्टची परफ़ॉर्मेंस बघून म्हणू शकतो की ती या पीढीची सर्वोत्तम अभिनेत्री आहे, जिच्याजवळ एक्सप्रेशंसची काही कमी नाही आहे. आलिया तुम्हाला हसवते तर कधी तुमच्या डोळ्यात अश्रु देखील आणते. तसेच चित्रपटात अंगद बेदी, कुनाल कपूर आणि अली जफ़रचे काम देखील उत्तम आहे. शाहरुख खान जेव्हा केव्हा स्क्रीनवर येतो एक वेगळीच ऊर्जा थिएटरमध्ये दिसून पडते. आलियाच्या मित्रांच्या रूपात इरा दुबे आणि बाकी एक्टर्सने देखील उत्तम काम केले आहे.  
 
चित्रपटाचे म्युझिक ...
चित्रपटाचे म्युझिक एकदा परत अमित त्रिवेदीने उत्कृष्ट दिले आहे, चित्रपटाचे टायटल ट्रक आणि बाकी गाणे चित्रपटाला शोभेसे आहेत. बॅकग्राऊंड स्कोर देखील चांगला आहे.  
 
बघायचे की नाही ...
आलिया भट्टची कलाकारी अदायगी आणि शाहरुख खानची प्रेजेंस आवडत असेल तर नक्की बघा.  
 
रेटिंग : 3/5 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments