Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कला अध्ययनासाठी जर्मनीत जायचंय?

वेबदुनिया
WD
जर तुम्ही कला क्षेत्राशी निगडीत असाल आणि उच्च शिक्षण घेण्याची ईच्छा असेल तर जर्मनीत जाऊन तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता. डीएएडीद्वारा कलाकारांना दिली जाणारी स्कॉलरशिप अशी स्कॉलरशिप आहे जी एक्टेंशन स्टडीजच्या रूपात दिली जाते. यासाठी फाईन आर्ट, डिझाईन, फिल्म, म्युझिकल परफॉर्मिंग आर्ट इत्यादी विषयात बॅचलर किंवा मास्टर डिग्री करणारे यासाठक्ष अर्ज करू शकतात. अ‍ॅकडमिक ईयरअंतर्गत संपूर्ण कोर्सच्या दरम्यान आर्थिक मदत दिली जाते. आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिन्याला 750 यूरो स्टायपेंडसह, भारत ते जर्मनी विमान खर्च दिला जातो. ज्या विद्यार्थ्याची निवड स्कॉलरशिपसाठी केली जाते त्यांच्याकडून नंतर कोणत्याही प्रकारची फिज घेतली जात नाही. स्टडी आणि रिसर्चमध्ये सबसिडी दिली जाते. डीएएडी निवड झालेल्यांची हेल्थ इन्शोरन्ससुद्धा केला जातो. सहा महिन्यांसाठी इंटरनेट बेसड्‍ लॅग्वेज कोर्ससुद्धा केला जातो. जो यासाठी प्रवेश घेतो त्याच्यासोबत पती अथवा पत्नी असल्यास त्याचा कोणत्याही प्रकारचा खर्च उचलला जात नाही.

योग्यता
प्रथम श्रेणीत शेवटची डिग्री मिळवलेली असावी आणि शेवटची डिग्री घेण्यात 6 वर्षाकेक्षा जास्त अंतर नसावे. अर्ज करतेवेळी अर्जदार भारतातील ‍रहिवासी असावा.

विषय
फाईन आर्ट डिझाईन, फिल्म-म्युझिक परफॉर्मिंग आर्ट (ड्रामा, डायरेक्शन, डांस, कोरिओग्राफी इत्यादी). लक्षात ठेवा अर्ज करताना सर्व डाक्युमेंटच्या दोन कॉपी संबंधीत पत्त्यावर पाठवाव्यात. ऑनलाईन अर्जाबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो अवश्य लावावा. दोन्ही ठिकाणी अर्जदाराच्या स्वाक्षर्‍या असाव्यात. संपूर्ण बायोडाटा टाईप केलेला असावा. जर्मनीमध्ये प्लान्ड स्टडी प्रोजेक्ट करण्याचे अ‍ॅकेडमिक आणि पर्सनल रिझन देणे आवश्यक आहे. ही माहिती पाठविताना वरिष्ठ अधिकार्‍यांचा रेफरन्स पाठविणे आवश्यक आहे. याबरोबर लॅग्वेज स्कोअर पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी डीएएडी -2, न्यायमार्ग, चाणक्यपूरी, नवीदिल्ली - 110021 किंवा www.daaddelhi.org या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरू शकता.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Dinner Special : पंजाबी छोले रेसिपी

Food to Reduce Cholesterol कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी काय खावे

मसूर फ्राइड डाळ रेसिपी

तुमचा ब्रश आजारांना आमंत्रण देत आहे का?

Beauty Tips : कोको पावडर फेसपॅकने चेहरा होईल चमकदार

Show comments