Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिनी भाषा करीयरसाठी आवश्यक

वेबदुनिया
WD
मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात आधी एक गोष्ट मनात पक्की केली पाहिजे, ती म्हणजे अवघ्या जगात त्यांना करीयरची संधी आहे. एखादा प्रांत, देशापुरते ते मर्यादित नाहीत. आपल्या पात्रतेच्या जोरावर ते जग मुठीत घेऊ शकतात.

भारतीय मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत पुढे जायचे असेल तर त्यांना प्रत्येक देशाची संस्कृती आत्मसात करावी लागणार आहे. 'हे विश्चची माझे घर', असे एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांनी समजले पाहिजे. या 'ग्लोबल व्हिलेज'मध्ये टिकाव धरण्यासाठी सार्‍या जगाचे धागेदोरे हातात घेणे गरजेचे आहे.

चीनी भाषाच का?
' ग्लोबल व्हिलेज'च्या या वातावरणात मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी चिनी भाषेकडे करीयर म्हणून पाहिले पाहिजे. कारण त्यामुळे चीनमध्ये करीयरची कवाडं उघडी होण्याची संधी आहे. याच कारणामुळे सध्या चीनमध्ये अमेरिकन विद्यार्थ्यांनी बस्तान बसवायला प्रारंभ केला आहे.

भारतीय विद्यार्थ्यांनीही आपल्या शिक्षणाच्या जोरावर चीनमध्ये क‍रीयर करण्याची धमक दाखवली पाहिजे. आपण कुठल्याच बाबतीत कमी नाही, असे समजले पाहिजे. कारण अमेरिकन एक्झिक्टुयिव्हमध्ये चीनमध्ये जास्त काळ टिकण्याची क्षमता नाही. त्याचबरोबर चीनी संस्कृती आत्मसात करू शकतील, एवढा आत्मविश्वासही त्यांच्यात नाही. त्या उलट भारतीय विद्यार्थ्यांमध्ये हे सगळं करण्याची केवळ धमकच नाही तर आत्मविश्वासही आहे. कारण चीनी संस्कृती ही भारतात असलेल्या बौद्ध धर्मातूनच विकसित झाली आहे.

फायदाच फायदा....
चीन जगातील सर्वच देशाच्या बाजारात आपल्या वस्तूंचा बाजार मांडत आहे. त्यामुळे आगामी काळात चीनचा जगात विस्तार वाढेल व त्याचा बिझनेस सांभळण्यासाठी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. त्यामुळे चिनी भाषा अवगत असलेल्या ‍भारतीय विद्यार्थ्यांना करीयरची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेसोबत चिनी भाषा आत्मसात करणे, ही भारतातील मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची गरज बनली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Dinner Special : पंजाबी छोले रेसिपी

Food to Reduce Cholesterol कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी काय खावे

मसूर फ्राइड डाळ रेसिपी

तुमचा ब्रश आजारांना आमंत्रण देत आहे का?

Beauty Tips : कोको पावडर फेसपॅकने चेहरा होईल चमकदार

Show comments