Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्रेंच भाषेतील करिअर

Webdunia
फ्रेंच भाषेचे महत्त्व, ती शिकण्यापासून होणारे फायदे आणि करिअर म्हणून त्यात असलेली सर्वोत्तम संधी याची माहिती. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग दिवसेन्दिवस जवळ येत आहे. साहजिकच विविध संस्कृतींची, विविध भाषा बोलणारी माणसे जवळ येत आहेत. यामधून परदेशी भाषा शिकायला सुरुवात झाली. भारतामध्ये सध्या परदेशी भाषा शिकणार्‍यांचे प्रमाण दिवसेन्दिवस वाढत आहे. फ्रेंच, र्जमन, चिनी आणि जपानी भाषा शिकण्यावर प्रामुख्याने भर दिला जात आहे. विशेष म्हणजे भारतातील मुख्य शहरांमध्ये या भाषा शिकणार्‍यांसाठी विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. या सदरात आपण फ्रेंच भाषेचे महत्त्व, ती शिकण्यापासून होणारे फायदे आणि करिअर म्हणून त्यात असलेल्या सर्वोत्तम संधीचा आढावा घेणार आहोत.
 
फ्रेंच भाषा का शिकावी? 
 
* फेंच भाषा पाच खंडांमधील दोन डझनहून अधिक देशांमध्ये बोलल्या जाते.
 
* फ्रान्स देशामध्येही आयबीएम, फोर्ड, कोका-कोला यासारख्या नामवंत अमेरिकन कंपन्या कारभार चालवितात. फ्रेंच भाषेमुळे या कंपन्यांची फ्रान्समधील संधीची दारं उघडतात.
 
* जगभरात इंग्लिश वगळता फ्रेंच भाषा तिसरी सर्वाधिक बोलल्या जाणारी भाषा आहे.
 
* संयुक्तराष्ट्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी आणि आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस यासारख्या अनेक मोठय़ा आंतरराष्ट्रीय संघटनांमध्येही फ्रेंच ही अधिकृत भाषा आहे.
 
* इंटरनेटवरही सर्वाधिक प्रमाणात वापरण्यात येणारी ही दुसरी भाषा आहे.
कुठे शिकावी ?
फ्रेंच भाषा शिकायची इच्छा असेल तर 'अलायन्स फ्रॉँसेज'(एएफ) या जगभरात उपलब्ध असणार्‍या शिक्षण संस्थेत जाऊन प्रवेश घेणे सोपे ठरेल. ही नावाजलेली संस्था भारतातही विविध प्रमुख शहरांमध्ये फ्रेंच भाषेचे धडे देते. आता 'अलायन्स फ्रॉँसेज' काय आहे हे जाणून घेऊया.
 
* 'अलायन्स फ्रॉँसेज' ही स्वयंसेवी संस्था जगभरात फ्रेंच भाषा आणि फ्रान्समधील संस्कृती याबाबतचा प्रसार करते. १३७ देशांमध्ये याच्या शाखा आहेत. नवोदितांना फ्रेंच भाषा शिकायची असेल तर त्यांनी 'अलायन्स फ्रॉँसेज'मध्ये प्रवेश घेणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण त्या शैक्षक्षिक संस्थेमार्फत फ्रेंच चित्रपट पाहणे, फ्रान्समधील विविध विषयांवर चर्चासत्र ऐकणे, फ्रेंच लोकांशी संवाद साधणे अशा अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेता येतो. फ्रेंच भाषा सर्रासपणे बोलण्यास या उपक्रमाची मदत होते.
 
* भारतात 'अलायन्स फ्रॉँसेज' ही संस्था १६ शहरांमध्ये कार्यरत आहे. त्यामध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही दिवसेन्दिवस वाढत आहे.
 
* 'अलायन्स फ्रॉँसेज'मधून फक्त फ्रेंच भाषेचे क्लासेसच नाहीत तर शिक्षकांसाठीचे ट्रेनिंग, भाषांतराचे कोर्सेस आणि विविध फ्रेंच भाषेशी संबंधित प्रमाणपत्र कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यामध्ये 'डीआयएलएफ-डीइएलएफ-डीएएलएफ' ही फ्रेंच भाषेत प्रावीण्य मिळवून देणारी परीक्षाही उपलब्ध आहे. या बाबतच्या अधिक माहितीसाठी http:afindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
 
कारकिर्दीच्या संधी
 
प्राध्यापक म्हणून कारकीर्द
 
* ज्यांना फ्रेंच भाषा शिकायला आवडते ते शिक्षक बनण्याचा पर्याय निवडतात. कारण यामुळे मुलांशी संवाद साधला जातो आणि फ्रेंच भाषा सहज बोलण्यास अधिक मदत होते तसेच शिकवण्यासाठी अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत.
 
* फ्रेंच भाषेचे शिक्षक व्हायचे असेल तर कोणत्या वयोगटातील मुलांना शिकवायला आवडेल हे प्रथम ठरवावे.
 
* तसेच ही भाषा परदेशी भाषा म्हणून शिकवायची असेल तर तुम्ही 'अलायन्स फाँसेज'मधून प्रशिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे.
 
* तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठस्तरावर तुम्ही शिक्षक म्हणून काम करू शकता.
 
भाषांतरकार आणि दुभाषी म्हणून कारकीर्द
 
* भाषांतरकार आणि दुभाषी म्हणून काम करणे हे सर्वात आव्हानात्मक आहे.
 
* इंग्लिश (किंवा अन्य कोणतीही भाषा) आणि फ्रेंच या दोन्ही भाषांवर प्रचंड प्रभुत्व लागते. जोडीला संयम आणि इच्छाशक्तीही लागते तसेच दुभाषी आणि भाषांतरकार म्हणून तुम्हाला अर्धवेळ आणि पूर्णवेळ कामाचा पर्याय उपलब्ध आहे.
 
* भाषांतरकाराचे काम हे लिहिलेल्या भाषेतून भाषांतर करण्याचे असते. त्यामध्ये पुस्तकांचे भाषांतर, सूचना, सॉफ्टवेअर मॅन्युअल्स आणि अन्य बाबींचे काम करावे लागते.
 
* दुभाषा हा एका भाषेतून दुसर्‍या भाषेत तोंडी भाषांतर करायचे काम करतो. जास्तकरून संयुक्त राष्ट्र, नाटो आणि सरकार अशा मोठय़ा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये दुभाषक काम करताना दिसतो. मात्र पर्यटन व्यवसायातही दुभाषाचे वाढलेले महत्त्व दिसून येते.
 
* दुभाषाचे काम दोन प्रकारे चालते. एक म्हणजे दुभाषा हा बोलणार्‍या व्यक्तीचे संवाद हेडफोनद्वारे ऐकतो आणि मायक्रोफोनमधून त्याचे भाषांतर करतो. दुसरी पद्धत म्हणजे दुभाषा संवाद लिहून घेतो आणि मग ते बोलणार्‍या व्यक्तीला भाषांतर करून सांगतो.
आंतरराष्ट्रीय संस्थेत कारकीर्द
 
* फ्रेंच भाषा शिकल्यास आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही नोकरीची संधी उपलब्ध आहे.  
 
आंतरराष्ट्रीय संस्था बर्‍याच असल्या तरी त्या खालील तीन मुख्य प्रकारांत मोडतात :-
 
* सरकारी
 
* बिगरसरकारी
 
* स्वयंसेवी धर्मादायी संस्था
 
फ्रान्समध्ये काम करा
 
फ्रेंच भाषा शिकल्यावर जर तुमच्याकडे शिक्षक, भाषांतरकार आणि दुभाषा म्हणून काम करण्याचे कौशल्य नसेल तर फ्रान्समध्ये भाषेशी निगडित नसणारी कामे तुम्हाला करणे सहज शक्य आहे.
 
मित्रांनो, एक फ्रेंच भाषेची प्राध्यापक, दुभाषी आणि भाषांतरकार म्हणून मी तुम्हाला असा सल्ला देईन की, जर परदेशी भाषा शिकण्याची आवड असेल तर फ्रेंचचा पर्याय निवडा. कारण या स्पर्धात्मक युगात या भाषेला बराच वाव आहे. फ्रेंच भार्षेत कारकीर्द घडवणार्‍यांना माझ्या शुभेच्छा.
 
पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात कारकीर्द
 
* तुम्हाला एकापेक्षा जास्त भाषा येत असतील आणि पर्यटनाची आवड असेल तर तुम्ही पर्यटन उद्योगात प्रवेश करणे उपयुक्त ठरेल. एअर हॉस्टेस-पर्सर, पायलट आणि विमानतळावरील स्टाफ यांची नेमणूक ही जास्तकरून त्यांच्या भाषाकौशल्यावर अवलंबून असते.
 
* टूर गाइड म्हणूनही काम करण्याची संधी मिळू शकते. म्युझिअम, स्मारके आणि अन्य पर्यटनस्थळांवर टूर गाइडची गरज भासते.
 
* परदेशात रेस्टॉरंट, हॉटेल, शिबिरे आणि स्काय रिसॉर्ट्स आदी ठिकाणांमध्येही दुभाषकाचा उपयोग होतो.
 
परराष्ट्र सेवा खात्यातील संधी
 
* तुम्हाला दोन भाषा येत असतील तर तुम्ही परराष्ट्र सेवेतही जाऊ शकता. राजदूतांचे दुभाषी म्हणूनही तुम्हाला काम मिळू शकते.
 
* परराष्ट्र सेवा खात्यामध्ये जाऊ इच्छिणार्‍यांना स्वत:च्या देशामधील सरकारमधील इत्थंभूत माहिती असणे गरजेचे असते. त्यातच फ्रेंच भाषा ही १२ पेक्षा जास्त देशांमध्ये स्थानिक भाषा म्हणून बोलल्या जाते. त्यामुळे जर तुम्ही त्यात प्रगल्भ असाल तर परराष्ट्र सेवा खात्यातून तुमची परदेशातही नियुक्ती होऊ शकते.
 
एडिटिंग आणि प्रूफ-रीडिंग
 
* दोन किंवा अधिक भाषांवर ज्यांचे प्रभुत्व आहे त्यांना बरीच मागणी आहे. लेख, पुस्तके आणि वर्तमानपत्रांमध्ये एडिटिंग, भाषांतरकार आणि प्रूफ-रीडिंगचे काम मिळवता येऊ शकते. मॅगेझिन, प्रकाशन संस्था आणि भाषांतरांच्या कार्यालयांमध्ये काम मिळू शकते.
 
* तुमची स्वत:ची कंपनी असेल तर तुम्ही फ्रेंच किंवा इंग्लिश भाषेतील वेबसाइटच्या भाषांतराचे कामही स्वीकारू शकता.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Dinner Special : पंजाबी छोले रेसिपी

Food to Reduce Cholesterol कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी काय खावे

मसूर फ्राइड डाळ रेसिपी

तुमचा ब्रश आजारांना आमंत्रण देत आहे का?

Beauty Tips : कोको पावडर फेसपॅकने चेहरा होईल चमकदार

पुढील लेख
Show comments