Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युवा पिढीचा आनंदोत्सव ‘फ्रेंडशिप डे’

Webdunia
आज आपण 21 व्या शतकाच्या उंबरठ्यावर आहोत. हे युग कॉम्प्युटर युग मानले जाते.आजच्या युगात तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. असं असलं तरी आजच्या युगातही नाते-संबंधांनाही तितकेच महत्त्व आहे.

सध्याची आमची पिढी रिलेशनशिपला खूप महत्त्व देते.हे रिलेशन वाढवण्यासाठी आमची पिढी काही दिवसही साजरे करते. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींतून आनंद कसा मिळवायचा हे या डेज कल्चर मधून शिकायला मिळते. अगदी चॉकलेट डे पासून ते साडी डे, मदर्स डे, फादर्स डे, टीचर्स डे तसेच फ्रेंडशिप डे ही आम्ही साजरा करतो. या डेज कल्चरला काही जणांचा आक्षेप असला तरी, यातून चांगले काही मिळते, जगण्याचा नवीन आनंद मिळतो, नवीन उमेद मिळते, असे समजायला काहीच हरकत नाही. त्यामुळे हा आक्षेप अनाठायी आहे.

ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. डे कल्चरचा विचार सोडून एका नवीन दृष्टिकोनातून याला पाहण्याची गरज आहे. आज शिक्षणाच्या निमित्ताने लाखो विद्यार्थी आपले शहर सोडून दुसर्‍या शहरात जातात. तिथे त्यांना सारेच अनोळखी असते. दररोजचा जगण्याचा आनंदही त्यांच्यासाठी नवखाच असतो. अशावेळी त्यांना खर्‍या अर्थाने मदत होते ती मित्र-मैत्रिणींचीच. मित्रांची जागा त्या शहरात असलेले आपले नातेवाईकही घेऊ शकत नाहीत. हे नाते वेगळंच असते. त्यामुळे अशांसाठी फ्रेंडशिप डे हा दिवस काही वेगळाच असतो.

यातच फ्रेंडशिप डेची चर्चा सगळीकडेच सुरू होते.कट्ट्यावर गरमागरम कॉफीचा स्वाद चाखणार्‍यांमध्ये, टवाळक्या करत पार्किंगमध्येच दिवस घालवणार्‍यांमध्ये, कट्ट्यावरती काही कॉमेंट्स करून एकमेकांना टाळ्या देण्यात धन्यता मानणार्‍या अशा सार्‍यांमध्ये फ्रेंडशिप डे चीच चर्चा असते.

बरं या दिवशी वेगळं असं काहीच करायचं नसतं. आपल्याला वर्षभर मदत करणार्‍या, आपल्या भावना जपणार्‍या, अशा आपल्या मित्र-मैत्रिणींना केवळ शुभेच्छा द्यायच्या असतात. आजकाल बाजारात या संदर्भात नव-नवीन गिफ्ट आपल्याला पाहायला मिळतात. यात शुभेच्छा पत्रं, फ्रेंडशिप बँड, अशा कितीतरी वस्तू आहेत.

बरं या वस्तू दिल्यानेच हा दिवस साजरा करता येतो असेही नाही. काही जण नि:शब्दपणेही हा साजरा करतात. आपल्या मित्र-मैत्रिणीची या दिवशी प्रकर्षाने आठवण आली तरी आपण त्याच्या मैत्रीला जपल्या सारखेच आहे. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेतला बाजारात या दिवशी अनेक शुभेच्छा पत्र आपल्याला पाहायला मिळतील. यात मजकुराची वानवा मुळीच नसते. ‘माझ्याशी मैत्री करशील का’, ते एखादा मित्र नाराज असेल तर ‘सॉरी’ च्या मजकुरापर्यंत सारे काही या शुभेच्छा पत्रात आपल्याला मिळते.

भाषेचं कुंपण या शब्दांना नसल्याने इंग्रजी ते मराठी पर्यंतचा प्रवास या ओळींचा असतो. या ओळीच इतक्या आकर्षक असतात, की त्यांची भुरळ प्रत्येकालाच पडेल. आजकाल मागची पिढी म्हणजेच पालकही हा दिवस साजरा करत आहेत. माझी आईही तिच्या मैत्रिणीला शुभेच्छा पत्र देते. तिलाही वाटतं आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीला काही तरी द्यावं.
आता हा दिवस इतका महत्त्वाचा असेल तर तो साजराही तशाच पद्धतीने व्हायला हवा ना? मग लागा तयारीला.. आणि आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत हा दिवस आनंदात साजरा करा.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

फ्रिझी आणि कुरळे केस मऊ करण्यासाठी हे 3 हेअर मास्क वापरा

Cooking Tips: कारल्याची भाजी कडू झाली असल्यास या टिप्स अवलंबवा , भाजी कडू लागणार नाही

Vaginal Ring अवांछित गर्भधारणेपासून टाळण्यासाठी वेजाइनल रिंग !

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

पुढील लेख
Show comments