आर्त हाक माझी पोहचू दे, तुजपाशी,
सकळ संकटाना ठावें तूच तारीशी,
सतत उद्विग्न मन हे होते माझे रे,
सुकर मार्ग, काढून त्यातून मज सावर रे,
गजानन माऊली तुजवीण मज नाही रे थारा,
हेही ठाव मज की तूच माझा सहारा,
माझ्या सवें इतरांही दाव की सन्मार्ग बाबा,
दुखवतो आहे तोच सर्वा, हे सांग तूच बा!
मनात माझ्या काय चालले, हे तुज न सांगणे,
आजवर साथ तुझीच मिळाली,यापुढेही हेच मागणे!
....अश्विनी थत्ते