Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ganeshotsav 2023 : गणपती बाप्पा मोरया' का म्हणतात, हा शब्द बाप्पाशी कसा जोडला गेला जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (15:42 IST)
Ganeshotsav 2023  :सध्या देशभरात गणेशोत्सव जोरात सुरू आहे. लोक विघ्नांचा नाश करणाऱ्या मंगलमूर्तीची पूजा करत आहेत. त्याला मोदक अर्पण करत आहेत.  गणपती बाप्पा मोरया' ही घोषणा लोकांमध्ये अतिशय सुलभ आणि लोकप्रिय आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषही मंडपात ऐकू येतो. सोशल मीडियावरही लोक मोरया, गणपती बाप्पा मोरया या हॅशटॅगसह अष्टविनायकाप्रती आपली भक्ती व्यक्त करत आहेत.आपण नेहमी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करतो. पण आपण गणपती च्या पुढे मोरया का म्हणतो त्याचा अर्थ काय आहे त्यामागील कथा जाणून घेऊ या. 
 
ही कथा आहे पुण्यातील चिंचवड गावातील. या गावात 1375 मध्ये  गोसावी यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला.ते  एक मोठे संत होते ते गणेशाचे एकनिष्ठ आणि अनन्य भक्त होते. त्यांनी तपश्चर्या केली आणि मोरगावातच मोरेश्वराची (भगवान गणेशाची) पूजा केली.ते मयूरेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर अंतरावर जायचे. ते वयाच्या 117 वर्षापर्यंत जात असे. नंतर वृद्धापकाळामुळे त्यांना जाणे शक्य नसे. त्यांना वाईट वाटायचे. ते दुखी राहू लागले. एके दिवशी बाप्पाने त्यांच्या स्वप्नात दर्शन देऊन मी तुला उद्याच  दर्शन देईन.
 
दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडात स्नान करताना त्यांनी पाण्यात डुबकी लावली आणि बाहेर येतांना त्यांच्या हातात गणपतीची लहान मूर्ती होती. ही मूर्ती त्यांनी मोरया गोसावी मंदिरात स्थापिली. मोरया यांची समाधीदेखील या ठिकाणी बांधण्यात आली आहे. 
 
मोरया गोसावी यांचा मुलगा चिंतामणी हा देखील गणेशाचा अवतार मानला जातो. मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली... आजही मोरया गोसावींची समाधी आणि त्यांनी स्थापन केलेले मोरया गोसावी गणेश मंदिर चिंचवडमध्ये आहे. अष्टविनायक (महाराष्ट्रातील प्रसिद्ध आठ गणेश मंदिरे) यात्रा सुरू करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्याचप्रमाणे महान आणि परम गणेश भक्ताच्या अद्भूत भक्ती, समर्पण आणि तपश्चर्येमुळे त्यांचे नाव गणपती बाप्पा बरोबर एक झाले आणि गणपती बाप्पा मोरया...मोरया मोरया...गणपती बाप्पा मोरया...असे म्हटले जाऊ लागले.


Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

पुढील लेख
Show comments