Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परमतत्व गणेश

Webdunia
श्री गणेशाच्या पुण्यस्मरणाने ज‍ीवनातील आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होतो. नेपाळपासून रामेश्वरमपर्यंत अनेक ठिकाणी गणपतीच्या मूर्ती दिसतात. दक्षिण आशियातही गणेशाची मनोभावाने आराधना केली जाते. महर्षी व्यास, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि रामदास स्वामी आदींनी त्यांच्या ओंकार स्वरूपाचे यशोगान केले आहे. संत तुलसीदानेही रामचरितमानसाच्या सुरवातीला श्री गणेश वंदना रचली आहे. सर्व मंगल कार्याच्या अगोदर गणेशाची पूजा केली जाते. श्रीकृष्णानेही गणेश व्रत केल्याचा उल्लेख आहे. गणेश मंगलकारी आणि कल्याणकारी आहे.

भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी गणपती अवतार झाल्याचा गणेश पुराणातील दुसर्‍या अध्यायात सांगितले आहे. काही ग्रंथात शुक्ल पक्ष चतुर्थीच्या मध्यान्हात गणेश प्रकट झाल्याचे सांगितले आहे. भविष्य पुराणानुसार प्रत्येक चतुर्थी गणपती जयंती समान आहे. 'हरी अनंत हरीकथा अनंता' या म्हणीनुसार श्री गणेशाला 108 नावे आहेत. संकट निवारण्यासाठी गणपतीचे स्मरण करणे हा एक रामबाण उपाय असल्याचे मानले जाते. संकट निवारण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना व अभिषेक केला जातो.

ग्रहमानानुसार जेव्हा चंद्र सूर्यापुढे बारा अंशाचा होतो तेव्हा एक तिथी असते. त्यानुसार पौर्णिमानंतर 48 ते 60 अंश चंद्रमा कालखंडाला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. गणेश पूजन-व्रत अनादिकाळापासून चालू आहे. गणपती उपनिषदात गणपतीसंबंधी धा‍र्मिक सणांची सविस्तर माहिती दिलेली आहे. संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात या महिन्यात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी राष्ट्रीय एकता आणि सामाजिक पुनरूत्थानासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. गणपतीची पूजा जपानमध्येही केली जाते. वैष्णव संहितेत गणेश संहितेचा उल्लेख मिळतो. गणेशाविषयी अनेक पौराणिक कथा आणि दंतकथा आहेत.

एका कथेनुसार पार्वतीला विवाहानंतर अनेक वर्षे मुल झाले नव्हते. पुत्रप्राप्तीसाठी पार्वतीने विष्णूची आराधना केली. तेव्हा विष्णूच गणेशाच्या रूपात अवतरले. दुसर्‍या कथेनुसार शनीच्या दृष्टीक्षेपाने बाल गणेशाचे मुंडके आकाशात अंतर्धान पावले. तेव्हा हत्तीचे मुंडके आणून त्यावर लावले आणि तो गजानन बनला. आणखी एका कथेनुसार पार्वतीने मातीपासून गणपती बनवून त्यात प्राण प्रतिष्ठापना केली. शिव घरी आले तेव्हा प्रवेशद्वारावर बसलेल्या गणेशाने त्यांना प्रवेशास मनाई केली. तेव्हा क्रोधित होऊन त्यांनी गणपतीचे मस्तक उडवले. नंतर सर्व देवतांची प्रार्थना केल्यावर हत्तीचे मस्तक त्यावर लावले. हत्तीला गणपतीचे रूप समजले जाते.

चतुर्थीला गणपतीची स्थापना केली जाते आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जन केले जाते. वैज्ञानिक दृष्टीकोनातुन गणपतीची शरीरयष्टी अर्थपूर्ण आहे. त्याचे मोठे-मोठे कान प्रार्थना ऐकतात असे वाटते. तोंडावर असलेली हत्तीची सोंड वाचा तपस्या किंवा वाणी नियंत्रणाचा संदेश देते. मोठे पोट सर्व गोष्टी पचन करण्याचे प्रतीक आहे. वडीलांप्रमाणे गणपती पण त्रिनेत्री आहे. कपाळावर चंद्र आहे. फरक एवढाच आहे की शिवाच्या जटेत चंद्र आहे. राक्षसांच्या नाशासाठी गणपती रौद्र रूप धारण करतो. त्याचे वाहन उंदीर आहे. त्याच्या भक्तानी 'एकदंत दयावान चार भुजाधारी' अशी स्तुती केली आहे. कुष्ठरोग्याला बरे करणे, नेत्रहीन लोकांना डोळे, वांझ स्त्रीला मुल आणि रंकाला राजा बनविण्याची क्षमता गणपतीत आहे. श्री गणेशाय नम: च्या उच्चारणाने सुरू केलेले कार्य सफल होते.
सर्व पहा

नवीन

सिद्ध मंगल स्तोत्र मराठी

आरती गुरुवारची

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

श्री गुरुगीता

आरती बुधवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

पुढील लेख
Show comments