Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीगणेश मंत्र- यशाचा मंत्र

Webdunia
WD
Parolekar
श्री गणेश हे बुध्दी, ज्ञान, यश व समृध्दीचे दैवत आहे. भाविकांच्या हाकेला धावून येणारा विघ्नहर्ता गणरायाचा मंत्र जप करून आपल्या सगळ्या दु:खाचे निवारण होत असते. दु:खाचे रूपांतर सुखात होऊन हमखास यश हे म‍िळत असते. इतकी 'पॉवर' आपल्या लाडक्या गणरायाच्या मंत्र जपात असते.

विघ्नहर्ताच्या मंत्र जपाने आपल्यात आत्मविश्वास निर्माण होऊन आपल्या करि‍यरमध्ये येणार्‍या बाधा आपोआप दूर होत असतात. श्रीगणेशचे मंत्र वस्‍तुत: सि‍ध्दी मंत्र आहेत. प्रत्येक मंत्रात एक विशिष्ट शक्ती आहे. मंत्राचा ‍विधीवत नियमित जप केल्यास फायदा होत असतो.

1. ओम श्रीगणेशायनमः
' ओम श्रीगणेशायनमः' हा मंत्र एक सकारात्मक व शुभ प्रारंभासाठी उपयोगी आहे. आपण महाविद्यालयात, ऑफिसात एखादा प्रोजेक्ट सादर करत असाल किंवा एखाद्या विषयावर रिसर्च करत असाल. प्रोजेक्ट सादर करण्‍यापूर्वी वरील मंत्र जप केल्याने आपल्या कामातील अडचणी दूर होऊन घेती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण करून लवकर हाता वेगळे करू शकाला.

2. ओम गं गणपतये नमः
' ओम गं गणपतये नमः' हा मंत्र जप केल्याने आपल्या शुभ कार्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही.

3. ओम विनायकाय नमः
' ओम विनायकाय नमः' हा मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्या यशाच्या मार्गातील अडचणी दूर होऊन आपल्या इच्छेनुसार आपण स्थान प्राप्त करू शकतो. सगळे काही आपल्या नेतृत्वाखाली होत असते. 'विनायक' या शब्दाचा अर्थ म्हणजे सगळे काही आपल्या हातात.

4. ओम विघ्ननाशायनमः
जीवन जगत असताना आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. करियरमध्येही त्याचप्रमाणे अडचणी निर्माण होत असतात. 'ओम विघ्ननाशायनमः' या मंत्र जपाने आपल्याला अडचणीमधून बाहेर पडण्याची शक्ती प्राप्त होत असते. आपल्यातील आत्मविश्वास जागृत होऊन पूर्ण कार्यक्षमतेने लक्ष्य प्राप्त करू शकतो.

5. ओम सुमुखायनमः
' ओम सुमुखायनमः' या मंत्राचा अर्थ असा की, आपले केवळ मुखच नाही तर आपली भावना, मन व आत्मा स्वच्छ व सुंदर झाला पाहिजे. आपले अंर्तमन स्वच्छ असेल तरच आपल्या मुखातून चांगले उद्‍गार बाहेर पडतील.

6. ओम क्षिप्र प्रसादायनमः
आपल्या मनात निर्माण झालेले नकारात्क विचार 'ओम क्षिप्र प्रसादायनमः' या मंत्र जपाने दूर करता येवू शकतात. वरील मंत्रात दु:खाचे निवारण करण्याची शक्ती आहे. या मंत्राचा नियमित जप केल्याने तात्काळ परिणाम जाणवतो.

7. ओम वक्रतुण्डाय हू ं
एखाद्या वेळी परिस्थिती‍ आपल्या हाता बाहेर जात असतो. तिच्यावर नियंत्रण मिळवणे फारच कठीन होत असते. अशा वेळी हताश न होता, 'ऐओम वक्रतुण्डाय हूं' या मंत्राचा जप करावा. आपल्या विरोधकांमधील गैर समज दू होऊन ते आपले समर्थक होतील.

विघ्नहर्ता गणरायाच्या वरील मंत्रांचा नियमित जप केल्याने आपल्या शुभ कार्यांत येणार्‍या अनेक अडचणी क्षणात दूर होऊन प्रत्येक समस्येला तोंड देण्‍यासाठी आपल्याला अद्‍भूत शक्ती म‍िळत असते.
सर्व पहा

नवीन

Shri Hanuman Chalisa Lyrics in English

Tulsi Pujan Diwas 2024: तुळशीपूजनाचा दिवस कधी असतो? शुभ काळ आणि महत्त्व जाणून घ्या

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

आरती सोमवारची

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

Show comments