Marathi Biodata Maker

ज्येष्ठा गौरी पूजन 2023 मुहूर्त, पूजा विधी Jyeshtha Gauri Avahana 2023

Webdunia
गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (08:11 IST)
Jyeshtha Gauri 2023 महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते. 2023 मध्ये 21 सप्टेंबर रोजी गौरी आव्हान तर 22 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि 23 सप्टेंबर 2023 रोजी गौरी विसर्जन आहे.
 
देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे. देवी गौरीचे घरांमध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुख-समृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते. आपआपल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते.
 
गणेश चतुर्थी दरम्यान गौरी गणपतीची पूजा
 
तीन दिवसांचा गौरी गणपती उत्सव
भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केलं जातं. पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोकं यादिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केलं जातं.
 
ज्येष्ठा गौरी पूजा शुभ मुहूर्त 2023
21 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी आवाहन सकाळी 06:12 वाजेपासून ते दुपारी 03.34 पर्यंत
22 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी पूजन
23 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी विसर्जन सकाळी 06:27 वाजेपासून ते दुपारी 02.55 पर्यंत
 
अनुराधा नक्षत्राची सुरुवात = 20 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2:58 पासून
अनुराधा नक्षत्र समाप्त = 21 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3:34 पर्यंत
 
काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते. या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते. महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनके पदार्थांचा नैवेद्य केला जातो. सवाष्णींना हळदी कुमकुम समारंभासांठी बोलावलं जातं. भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती 5000 वर्षे जुन्या आहेत. 
असे करतात हे पूजन
हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.
 
महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
 
तिसर्‍या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

आरती बुधवारची

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

संक्रांतीला काय वाण द्यायचे? पहा या ५० युनिक वस्तूंची यादी

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments