Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्येष्ठा गौरी 2024 आवाहन मुहूर्त, पूजा विधी Jyeshtha Gauri Avahana 2024

ज्येष्ठा गौरी 2024 आवाहन मुहूर्त  पूजा विधी Jyeshtha Gauri Avahana 2024
Webdunia
Jyeshtha Gauri 2024 महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते. 2024 मध्ये 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन तर 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि 12 सप्टेंबर 2024 रोजी गौरी विसर्जन आहे. 
 
देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे. देवी गौरीचे घरांमध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुख-समृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते. आपआपल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते.
 
गणेश चतुर्थी दरम्यान गौरी गणपतीची पूजा
 
तीन दिवसांचा गौरी गणपती उत्सव
भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केलं जातं. पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोकं यादिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केलं जातं.
 
ज्येष्ठागौरी पूजन
 
या वर्षी 10 सप्टेंबर रोजी ज्येष्ठगौरी पूजन शुभ सण सुरू होणार आहे आणि 12 सप्टेंबर 2024 रोजी संपेल.
 
ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजा आणि विसर्जन 2024 तारखा
 
ज्येष्ठा गौरी आवाहन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 रोजी
 
ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त
सकाळी 6:04 ते संध्याकाळी 6:32 पर्यंत
कालावधी - 12 तास 28 मिनिटे
 
ज्येष्ठा गौरी पूजन
बुधवार, 11 सप्टेंबर 2024 रोजी
 
गुरुवार, 12 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन
अनुराधा नक्षत्र सुरू होते - 9 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:04 वाजता
अनुराधा नक्षत्र संपेल - 10 सप्टेंबर 2024 रात्री 8:04 वाजता

काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते. या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते. महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनके पदार्थांचा नैवेद्य केला जातो. सवाष्णींना हळदी कुमकुम समारंभासांठी बोलावलं जातं. भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती 5000 वर्षे जुन्या आहेत. 
 
असे करतात हे पूजन
हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.
 
महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
 
तिसर्‍या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Gudi Padwa 2025: गुढी पाडवा सणाबद्दल 10 खास गोष्टी

Ram Navami 2025 राम नवमी कधी? दुर्मिळ योगायोग, योग्य तारीख- शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

Sheetala Saptami 2025 शीतला सप्तमी कधी ? शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

शीतला आरती Shitala Mata Aarti

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख
Show comments