Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अश्वारूढ गणेशमूर्तीची आगळी परंपरा

Webdunia
मुंबईतील गुप्ते कुटुंबात अश्वारूढ गणेशाच्या मूर्तीची परंपरा आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती मुंबईत बनवून येते ती मध्य प्रदेशातील इंदूरहून.      
गणपतीच्या विविध रूपातील देखण्या मूर्ती असतात. सिंहासनारूढ, कमळ, उंदरावर बसलेला गणपती तसेच विविध भावमुद्रांमध्ये गणेशाच्या मूर्ती तयार केल्या जातात. काहींनी मोठी तर काहींना लहान मूर्ती आवडते. पण या आवडीनिवडी पलीकडे जाऊन घराण्याची परंपरा म्हणून परप्रांतातील मूर्तिकाराकडून खास मूर्ती बनविणारेही काही आहेत. मुंबईतील गुप्ते कुटुंबात अश्वारूढ गणेशाच्या मूर्तीची परंपरा आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती मुंबईत बनवून येते ती मध्य प्रदेशातील इंदूरहून. 'एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.. ' करीत शेकडो किलोमीटरचा प्रवास करून ही मूर्ती मुंबईत पोहोचते अन तेवढ्याच भावनेने तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

PR
' म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात... ' या गीताचे बोल कानावर पडताच आठवण होते ती गडकोटांची, द-या-खो-यांची... आपण म्हणाल याचा आणि गणपतीचा काय सबंध? वरवर पाहता असा काहीच सबंध नाही पण, घोड्यावर आरूढ या मूर्तीमागची पार्श्वभूमी काहीशी अनुरूप आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये महाड गावापासून 10 किलोमीटरवर नातं नावाचं छोटंसं गाव आहे. शिवकालामध्ये देशमुख आणि गुप्ते या आडनावाचीच माणसे या गावात राहत होती. ही सर्व माणसे शिवाजी महाराजांच्या सैन्यात लढवय्ये म्हणून होती. एकदा लढाई जिंकून परत येत असताना गणेशोत्सवाचे दिवस जवळ येत होते. त्यावेळी गणेशाची मूर्ती घोड्यावरून आणली गेली. त्यानंतर मूर्ती घोड्यावरून आणण्याची प्रथा रूढ झाली. कालांतराने देशमुख आणि गुप्ते घराण्यातील लोकांनी घोड्यावर आरूढ गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास सुरवात केली. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा जपली जात आहे.

PR
आजच्या काळात घोड्यावर बसलेल्या गणपतीची मूर्ती बघायला मिळणे दुर्मिळच. मूर्ती घडविणारे मूर्तिकार मिळणे तर अशक्य. वर्षानुवर्षांपासून गुप्ते घराण्यातील एका पिढीसाठी इंदूर येथील श्री. केसकर अशी मूर्ती घडवितात. गेल्या 50 वर्षांपासून श्री. केसकर यांनी ही परंपरा सुरू ठेवलेली आहे. आज त्यांचे मुलगे आणि नातू देखील ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे. ही मूर्ती घडविण्याने केसकरांनाही आनंद मिळतो. एक तर वेगळ्या रूपातील मूर्ती घडविण्याबरोबरच एका कुटुंबाची परंपरा आपल्याकडून जपली जात आहे याची विशेष आनंद ते व्यक्त करतात.

गंभीर आजारांपासून मुक्त राहण्यासाठी अश्वत्थ स्तोत्राचे पठण करा Ashwattha Stotram

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

श्री कृष्ण कवच

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक

Sai Baba Puja Mantra गुरुवारी करा साईबाबांची पूजा, उपवासाचे नियम मंत्र जाणून घ्या

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Show comments