Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी जितन राम मांझी

Webdunia
मंगळवार, 20 मे 2014 (10:41 IST)
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी जितन राम मांझी यांची निवड करण्याचा निर्णय सोमवारी (19 मे) घेण्यात आला. मांझी यांनी संध्याकाळी बिहारच्या राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. जितन राम मांझी नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात मागासवर्गीय कल्याण विभागाचे मंत्री होते.

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नितीशकुमार मागे घेणार नसल्याचे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी स्पष्ट केल्यानंतर मांझी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले. नव्या नेत्याच्या निवडीचे सर्वाधिकार नितीशकुमार यांना देण्यात आले होते.  यावेळी राज्यपालांकडे मांझी यांच्या नेतृत्त्वाखाली नव्या सरकारसाठी सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव स्विकारावा लागल्यानंतर नितीशकुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजीनाम्याचा फेरविचार करावा, असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आल्यामुळे रविवारी त्यांनी विचार करण्यासाठी एक दिवसाची मुदत मागितली होती. मात्र, राजीनाम्याच्या निर्णयावर ते ठाम राहिले. 
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी, 100 हून अधिक जणांचा मृत्यू

Show comments