Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लालूप्रसाद यादवांचा नितीशकुमारांना पाठिंबा

Webdunia
गुरूवार, 22 मे 2014 (21:49 IST)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागत असलेले बिहारचे कट्टर राजकीय वैरी समजले जाणारे नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र आले आहे. बिहारमध्ये सरकार स्थापन करण्‍यासाठी शुक्रवारी होणार्‍या विश्वासदर्शक ठरावादरम्यान लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीत सडकून मार खाल्यानंतर नितीशकुमार यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. जदयूला फक्त दोन जागांवर विजय मिळाला होता. नंतर जदयूच्या आमदारांच्या बैठकीत जितनराम मांझी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्‍यात आली होती. परंतु आता बिहारमधील सत्ताधारी जदयू सरकारला सत्ता स्थापनेसाठी शुक्रवारी (23 मे) विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. यावेळी लालुप्रसाद यादव जदयूला आपला पाठिंबा देणार आहे. कॉंग्रेसने यापूर्वी जदयूला पाठिंबा दिला आहे.

लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने बिहार सरकारला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क मांडले जात आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत आज होणार 'मोठा निर्णय'? एकनाथ शिंदे यांच्या अचानक सातारा दौऱ्याचे कारण आले समोर

Cyclone Fengal चा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार, या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस नाही तर कोण? जाणून घ्या विलंबाचे खरे कारण

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

Show comments