Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकसभा २०१४ एक्झिट पोलचा कौल : निकालाआधीच ‘मोदी सरकार’!

Webdunia
मंगळवार, 13 मे 2014 (11:02 IST)
लोकसभा निवडणुकीचे संपूर्ण नऊ टप्पे सोमवारी पूर्ण झाले. या अखेरच्या टप्प्यातही भरघोस मतदान झाले. आज मतदान पूर्ण होताच एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले आहेत. इंडिया टूडे आणि आज तक सिसरोच्या एक्झिट पोलमध्ये केंद्रात रालोआ आघाडीचे सरकार बनण्याचे संकेत दिसत आहेत. एक्झिट पोल नुसार रालोआला २६० ते २८० जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. यामध्ये संपुआला फक्त ११५ जागा आणि इतर पक्षांना २५० ते २६२ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मताच्या टक्क्यांबाबत रालोआला ३८ टक्के मते मिळतील, ही मते २००९ च्या तुलनेत १२ टक्के अधिक आहेत. संपुआचा मताचा टक्का मात्र एक्झिट पोलमध्ये घसरला आहे. संपुआला केवळ २६ टक्के मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना ३६ टक्के मिळतील, असा तर्क आहे. 
 
इंडिया टूडे ग्रुपच्या सिसरोसोबत संपूर्ण देशभरातील एक्झिट पोल आज जाहीर करण्यात आले. या सर्वेमध्ये देशात भाजप प्रणित रालोआ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल दर्शविण्यात आले आहे. यात रालेआला २६१-२८३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेस प्रणित संपुआ आघाडीला ११०-१२० जागांवर समाधान मानावे लागेल आणि इतर पक्षांना २५० ते २६२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. 
 
इंडिया टीव्ही-सी व्होटरच्या सर्वेनुसार देशात रालोआला २८९ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. तर संयुक्त पुरोगामी आघाडीला १०१ जागा, आम आदमी पक्षाला पाच जागा आणि इतरांना १४८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बिहारमध्ये भाजपला २८ जागा, जदयूला दोन तर काँग्रेसला १० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या सर्वेनुसार आज तक वृत्तवाहिन्याच्या सर्वेनुसार देशात रालोआला २७२ ते २८३ जागा मिळू शकतात. तर संपुआला ११० ते १२० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दिल्लीमध्ये भाजपला ६ जागा मिळतील. तर एबीपी नेल्सन एक्झिट पोल नुसार उत्तर प्रदेशात भाजपला ४६ जागा, तर काँग्रेसला केवळ ८ जागा, समाजवादी पार्टीला १२ जागा आणि बसपाला १३ जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे. 
 
उत्तर प्रदेश, बिहारमध्ये भाजपची सरसी 
एबीपी न्यूजच्या एक्झिट पोल भाजप प्रणित रालोआला आघाडी मिळत आहे. काँगे्रस मात्र पिछाडीवर आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काँग्रेसला चांगला झटका बसण्याची शक्यता या एक्झिट पोलमधून व्यक्त केली आहे. एबीपी न्यूज एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी भाजपला ४६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला केवळ ८ जागा मिळत आहेत. बसपाला १३, सपाला १२ आणि इतर एक. असे पक्षीय बलाबल असेल. बिहारमध्ये काँग्रेसचे पानिपत होण्याची शक्यता आहे. या राज्यात काँग्रेसला केवळ ४ च जागा मिळतील, तर भाजपला सर्वाधिक १९ जागा मिळतील, जदयूला ५, राजदला १० तर लोकजन शक्तीला दोन जागा मिळतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातही काँग्रेसच्या परड्यात फार काही यश मिळताना दिसत नाही महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी काँग्रेसला ९, राष्ट्रवादीला ६, भाजपला २१, शिवसेनेला ११ तर आम आदमी पक्षाला केवळ एक जागा मिळेल.
 
२७२ जागा न मिळाल्यास तर भाजपचा प्लान ‘बी’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांना पूर्ण विश्वास आहे की, लोकसभा निवडणुकीत रालोआला स्पष्ट बहुमत मिळून नवीन सरकार बनविल. जर रालोआला २७२ जागांचा जादूई आकडा नाही मिळाला तर त्यासाठी संघ आणि भाजपने प्लान ‘बी’ तयार केला आहे. या योजनेनुसार भाजपला जर बहुमत मिळाले नाही तर जयललिता, ममता बॅनर्जी किंवा मायावती यांच्याशी हातमिळवणी न करता देशातील छोट्या प्रादेशिक पक्षांचे सहकार्य घेईल. प्रामुख्याने लोकदल, बीजू जनता दल, टीआरएस असे पक्ष सोबतीला घेऊ शकते. 
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

नंदुरबारमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून २ मुलांचा मृत्यू

कुमार महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना मृत्यू

श्रीलंकेने बांगलादेशकडून 7 धावांनी पराभूत झालेला सामना जिंकला

कुमार नितेश पॅरा बॅडमिंटनमधील वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारासाठी नामांकित

सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला थोडक्यात बचावले

Show comments