Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुरुविण नाहि दुजा आधार।

Webdunia
शनिवार, 12 जुलै 2014 (11:17 IST)
‘धन्य धन्य हे गुरु-शिष्यपण।

धन्य धन्य हे सेवा विधान।

धन्य धन्य हे अभेद लक्षण।

धन्य धन्य लीला अगाध।।’

‘गुरू’ हा मानवाचा अध्यात्मिक पिता मानला आहे. गुरूशिवाय मानव देहाला मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्षाची इथे थोडीशी व्याख्या मी ‘ज्ञान’प्राप्त झाल्यावर जे समाधान वा आनंद मिळतो, तेच ब्रह्म अशी करतो. अज्ञानाचा नाश करणारा फक्त आपला गुरूच असतो. रोजच्या व्यवहारिक जीवनात कितीतरी ‘गुरू’ होत असतात. आपण कळत नकळत काहीतरी शिकत असतो. एखादी गोष्ट दुसर्‍या व्यक्तीने केली तर ती चूक की बरोबर हा भाग निराळा, परंतु काहीतरी चांगले-वाईट आपल्याला जाणवत असते. म्हणजे काहीअंशी तोही आपला गुरूच परंतु

‘कानी जे पेरिले,
नयनी ते उगविले।


असे सर्वसिद्ध गुरू कमीच. नेहमी आपल्याबरोबर गुरू सहवास घडावा, असे प्रत्येकाला  वाटत असते.

‘जन्मो-जन्मीचा ध्यास’
परी लाभो नाही गुरू सहवास।


असं काहीसं आपल्याबरोबर घडत असतं. याला ‘प्राक्तन’ असं म्हणतात. ईश्वराच्या  अनुग्रहाशिवाय गुरू सहवास, ज्ञान प्राप्त होणं कठीणच. परमेश्वराच्या अनुग्रहाने गुरू संप्रदाय मिळतो. गुरू-शिष्याची दृष्टादृष्ट होणे किंवा एकमेकांची मने परस्परांकडे आकर्षित होणे हा केवळ योगायोग नव्हे. पूर्व ऋणानुबंधाने या गोष्टी घडतात. आपल्या गुरु-शिष्य  परंपरेत काहींची नावे घ्यावी वाटतात. ती म्हणजे- श्रीकृष्ण परमात्माच्या व सांदिपनी ऋषी, प्रभू रामचंद्र व वसिष्ठ, अर्जुन-द्रोणार्चा, द्रोणाचार्य-एकलव्य, श्री समर्थ रामदास व कल्याणस्वामी. हनुमंताने दास्य गुरुभक्ती केली. ध्रुवाने नारदांकडे गुरुसेवा केली.

‘एकशिष्य एक गुरू। ऐसा रूढला साच व्यवहारू।।’ याप्रमाणे वरील साधकांनी गुरु-शिष्य   परंपरा साधली. एकलव्याच्या बाबतीत खरी अंत:करणातील गुरु भक्तीची उत्कटता, कृतार्थता वाटते. धनुर्विद्या शिकवण्यासाठी द्रोणाचार्यांनी नकार दिला. एकलव्याने त्यांचेच  ठायी ‘गुरुबुद्धी, गुरुनिष्ठा’ ठेवून नितांत शिष्य भावनेने आचार्यांची  मृत्तिकेची प्रतिमा   करून अर्जुनापेक्षाही अधिक व त्वरित प्राविण्य धनुर्विद्येत संपादन केले.

‘अगा गुरूते जै पुसावे।
तै येणे माने सावध होआवे।
हे एकाची जाणे आघवे। सव्यसाची।।’


जे आत्मज्ञान उदित होताच बुद्धीचे डोळे उघडतात, जीव आनंदाचे दोंदावर लोळू लागतो, ते ज्ञान या जगात फक्त गुरुमुखातूनच मिळू शकते. त्यासाठी गुरूची प्रसन्नता आवश्कता आहे व हे केवळ श्रीगुरूंच्या निष्कपट, नि:स्वार्थ आणि एकनिष्ठ सेवेनेच लाभू शकते आणि म्हणूनच सच्चा गुरुभक्त उभे आयुष्य ‘गुरू’ परिचर्येस वाहण्यास सिद्ध असतो. गुरूसेवेत कसलीही कमतरता, धसमुसळेपणा त्याला चालत नाही.

एखाद्या झोपलेल्या व्यक्तीचया आजूबाजूस वावरताना कोवळ्या मनाचा माणूस आपल्या   पावलांचा आवाजही होऊ न देणची जप्रङ्काणे दक्षता घेतो, तप्रङ्काणे शिषने गुरू सेवेचे सर्वच व्यवहार गुरूंना-सद्गुरूंना सुखावह होतील. राहतील अशा नाजूकरीतीने व्हावेत, अशी भावना गुरूबद्दल व्यक्त करतो तोच सच्चा शिष्य.

गुरूंची सेवा करणत जो ‘ढिला’ आहे किंवा जो भिला (लाजला) तो भ्याड (अंगचोर) आहे. त्यास शिष्य म्हणून घेण्याचा अधिकार नाही.

‘म्हणे पावो धडफैल।
तर्‍ही निद्रा स्वामींची मोडेल।’

 

माझ्या सद्गुरूंची अखंडता खंडित होईल किंवा माझ्या गुरूंची निद्रा मोडेल, असा जो मनी भाव ठेवतो तो शिष्य. गुरू हे शिष्याची चौरस बाजूंनी परीक्षा घेत असतात. त्यात तो एकनिष्ठ राहिला पाहिजे. याला समर्थ रामदासांची गोष्ट साक्ष देते. समर्थानी कल्याण शिष्याच्या विविध परीक्षा घेतल्या; मात्र ते त्यात सफल झाले. ते गुरुचरणी एकनिष्ठ होते. म्हणून-

‘करूनि सद्गुरूस्मरण अनुभविजे’
‘व्यासोच्छिस्टं जगत् सर्वम’


व्यासांनी जगातील कोणत्याही वस्तूंवर लेखन केले नाही, असे नाही. व्यासांना मुख्य गुरूपीठ मानून आपण ‘गुरुपौर्णिमा’ साजरी करतो. ‘गुरुपौर्णिमा’ हा शिष्यांसाठी एक मोठा सणच असतो. गुरूंबद्दल आदर करणे, त्यांचे आभार मानण्यासाठी आज आपण या व्यासपीठरूपी गुरूंचे पूजन करतो. या दिवशी ‘गुरु’चे सामर्थ्य हजार पटीने फलद्रूप असते.
सर्व पहा

नवीन

गंभीर आजारांपासून मुक्त राहण्यासाठी अश्वत्थ स्तोत्राचे पठण करा Ashwattha Stotram

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

श्री कृष्ण कवच

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक

Sai Baba Puja Mantra गुरुवारी करा साईबाबांची पूजा, उपवासाचे नियम मंत्र जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार