Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तस्मै श्री‍गुरूवे नम:

- भीका शर्मा

Webdunia
शरीरं सुरुपं तथा वा कलत्रं
यशश्चारू चित्रं धन मेरुतुल्यम्।
मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रिपद्में
तत: किं तत: किं तत: किं तत: किम्। ।

आपणांस सौदर्य लाभले, पत्नीही रूपवती आहे, चारी दिशांत आपली सर्त्कीती पसरली आहे, मेरू पर्वताऐवढी अपार धनसंपत्ती लाभली आहे, मात्र गुरूच्या चरणी आपणं नतमस्तक होत नसाल तर यशास अर्थ काय? श्री आदि शंकराचार्यांनी या श्लोकात गुरूचा महिमा व महात्म्य विशद केले आहे.

गुरुकाश्चान्धकारो हि रुकारस्तेज उच्यते।
अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न सशय:। ।

' गु' या शब्दाचा अर्थ आहे अंधार (अज्ञान) तर 'रू' शब्दाचा अर्थ आहे प्रकाश (ज्ञान). अज्ञानाचा नाश करून जीवन प्रकाशित करणारे ब्रम्ह रूप म्हणजेत गुरू. तात्पर्य गुरूरूपी‍ प्रकाश आपणांस अज्ञानातून ज्ञाऩ अनी‍तितून नीति, दुर्गुणापासून सदगुण, विनाशापासून कल्यानाकडे, शंकेपासून संतृष्टीकडे़, अहंभावापासून विनम्रतेकडे तर पशुत्वापासून मानवतेकडे जाण्याचा मार्ग दाखवत असते.

गुरूशिवाय जीवन अपूर्ण आहे. शास्त्रानुसार निगुरांना कधीच मोक्ष प्राप्ती होत नाही, शिवाय त्याने केलेल्या पुण्याचे फळही त्यास मिळत नाही. गुरूचरणामृताचा एका थेंबापासून प्राप्त होणारे फळ सर्व तीर्थक्षेत्रात स्नानातून मिळणार्‍या फळापेक्षा हजारपट अधिक असते.

गुरू व परमेश्वर : गुरू भक्ति व परमेश्वराच्या भक्तीत फरक नसलातरी गुरूस परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ स्थान बहाल करण्यात आले आहे. गुरूच्या ज्ञानाशिवाय सर्वव्यापी परमेश्वरही अज्ञातच राहतो. कबीर दासांनी गुरू महिमा व्यक्त करतांना म्हटले आहे की

गुरु गोविंद दोउ खड़े काके लागूँ पाय।
बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय।।

भगवान शिव स्वत:च म्हणतात-
यो गुरु: स शिव: प्रोक्तो य: शिव: स गुरुस्मृत:।
तात्पर्य गुरू म्हणजेच शिव, व शिव म्हणजेच गुरू.

गुरूस साक्षात परब्रम्हाची संज्ञा देण्यात आली आहे.
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरूर देवो महेश्वराय।
गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै ‍श्री गुरुवे नम:। ।

गुरू व शिष्य : गुरू एक परिवर्तन घडवून आणणारी शक्ती आहे. गुरूची कृपा असेल तेथे विजय निश्चित आहे. गुरू-शिष्य नाते तर्कापेक्षा श्रद्धा, आस्था व भक्तिवर टिकून असते. भावनिक प्रदर्शन म्हणजे गुरूभक्ती नव्हे. भक्ति म्हणजे समर्पण.

शिष्याचे गुरूप्रति समर्पणच गुरू-शिष्य नात्याची वीण अधिक घट्ट करत असते. गुरूच्या निवडीपूर्वी म्हणूनच मनुष्याने तर्क-वितर्क, सत्य-असत्य यासारख्या पैलूंची योग्य पारख करायला हवी. मनात कसलाही संशय रहायला नको, कारण समर्पणाशिवाय गुरूभक्ती निरर्थक आहे.

प्रमुख शिष्य व त्यांचे गुरू -

श्रीराम : गुरू वशिष्ठ
श्री कृष्ण . महर्षि संदीपनि
आरूणि : धौम्य ऋषि
संत एकनाथ : श्री जनार्दन स्वामी
स्वामी एकनाथ : श्री जनार्दन स्वामी
स्वामी विवेकानंद : स्वामी रामकृष्ण परमहंस
छत्रपति शिवाजी : संत रामदास
आदि शंकराचार्य : श्री गोविंदाचार्य
सर्व पहा

नवीन

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

Santoshi Mata Vrat Vidhi in Marathi संतोषीमाता व्रत संपूर्ण माहिती

आरती शुक्रवारची

गंभीर आजारांपासून मुक्त राहण्यासाठी अश्वत्थ स्तोत्राचे पठण करा Ashwattha Stotram

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

Show comments