आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना
भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असत.
चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे.
गुरूपौर्णिमा व्रत कसे कराल?
1. सकाळी घर साफ करा. स्नान करून सर्व कामे आटोपून घ्या.
2. एखाद्या पवित्र ठिकाणी बसून अभ्यास करा. सफेद वस्त्र अंथरून त्यावर पूर्वात्तर (पूर्व-पश्चिम) किंवा दक्षिणोत्तर (दक्षिण-उत्तर) गंधाने बारा-बारा रेघा ओढून व्यासपीठ तयार करा.
3. त्यापूर्वी 'गुरूपरंपरासिद्धयर्थ व्यासपुजा करिष्ये' मंत्र जपा.
4. नंतर दहाही दिशांना अक्षता टाका.
5. आता ब्रम्हा, व्यास, शुकदेव, गोविंद स्वामी आणि शकराचार्यांच्या नावाने मंत्र पूजा करा.
6. नंतर आपले गुरू किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्या.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी काय करावे?
1. यादिवशी केवळ गुरूच (शिक्षकच) नाही, तर आई-वडिल, मोठ्या भाऊ-बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे.
2. यादिवशी वस्त्र, फळ, फुले व हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळवला पाहिजे. कारण गुरूचा आशीर्वाद विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी आणि ज्ञानवर्धक असतो.
3. व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास-मनन करून त्यांच्या उपदेशांचे आचरण केले पाहिजे.
4. हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरूप्रती दाखविलेला विश्वास, आदर आहे.