Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संकटमोचन हनुमान

Webdunia
श्रीरामभक्त हनुमानाला बळ, बुद्धि, विद्या, शौर्य व निर्भयतेचे प्रतीक मानले जाते. संकटसमयी हनुमानाचे स्मरण केले जाते.
संकटमोचन म्हणूनही हनुमानाची पूजा केली जाते.हनुमानला शिवावतार तसेच रुद्रावतारही म्हटले जाते. 'रुद्र' प्रलयाचे अधिष्ठाता असून देवादीदेव इंद्राचे सहकारीही आहे. विष्णू पुराणानुसार रुद्राचा उद्धार ब्रह्मदेवाजवळ असलेल्या भस्मापासून झाला होता.

' हनुमान' या शब्दातील 'ह' ब्रह्माचा, 'नु' अर्चनाचा, 'मा' लक्ष्मीचा, व 'न' पराक्रमचा द्योतक आहे.

हनुमानाला सर्व देवाकडून वरदान प्राप्त झाले होते. श्रीरामाचा सेवक म्हणून हनुमानाला पुजले जाते. राजदूत, नीतिज्ञ, विद्वान, रक्षक, वक्ता, गायक, नर्तक, बलवान व बुद्धिमान म्हणूनही हनुमानाचा उल्लेख विष्णू पुराणात आला आहे.

शास्त्रीय संगीतातील तीन आचार्यांमध्ये हनुमानजी आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त शार्दूल व कहाल असेल. 'संगीत पारिजात' हनुमानाचे संगीत-सिद्धांतावर आधारित आहेत.

हनुमानाने सर्वप्रथम रामकथा शिळेवर लिहिली होती, असे सांगितले जाते. रामकथा ही रामायणाआधीच लिहिली गेली होती. 'हनुमन्नाटक' याना नावाने ती प्रसिद्ध आहे.

हनुमानाच्या जन्म-स्थळाविषयी निश्चित सांगता येत नाही. मध्य प्रदेशातील आदिवासी बांधव हनुमानाचा जन्म रांची जिल्ह्यातील अंजन येथे झाला होता, असे मानतात. हनुमानाचा जन्म कर्नाटक राज्यात झाला होता अशी कर्नाटकमधील भाविकांची धारणा आहे. नाशिक- त्र्यंबक रस्त्यावर अंजनेरी येथे झाला होता, असे मानतात.

अंजनीच्या कानात पवनाने प्रवेश केल्याने ती गर्भवती राहिली व हनुमानाचा जन्म झाला, असा विष्णु पुराणात उल्लेख आहे.

आनंद रामायणानुसार हनुमानाचा आठ श्रीमंतामध्ये उल्लेख केला जातो. अश्वत्थामा, बळी, व्यास, बिभीषण, नारद, परशुराम व मार्कण्डेय हे इतर सात देव आहेत.

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments