Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मार्गशीर्ष गुरुवार संपूर्ण माहिती Margashirsha Guruvar Vrat

Webdunia
बुधवार, 15 डिसेंबर 2021 (13:00 IST)
मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. याचे नियम आणि पूजा पद्धत जाणून घेयू या- 

ALSO READ: मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा
मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे.
या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. 
व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यांत महालक्ष्मीस्वरूप जाणून त्यांना हळदी-कुंकु लावावे. मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा, आरती, कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी. 
पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदीकुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मीस्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा. 
शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा-वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आर्शिवाद घ्यावा. 
सायंकाळी गाईची पूजा करून गोग्रास द्यावा.
व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे.
गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ति असावी. सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे.
काही कारणामुळे गुरुवारी पूजा-आरती-कहाणी करणे शक्य नसेल, तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. 
व्रताचे दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा-आरती- कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर कुटुंबियांसमवेत मिष्टान्न भोजन करावे.
व्रतामध्ये फळे, दूध वगैरे घ्यावे. निराहार राहू नये.

ALSO READ: ॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥
 
पूजा पद्धत
घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. 
सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदुळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद-कुंकू वाहावे.
एक तांब्याचा कलश स्वच्छ करुन कलशाच्या बाहेरच्या बाजूंना हळदी-कुंकवाची बोटे ओढावी. 
कलशात पाणी भरून 1 नाणं, 1 सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्या. 
तोंडावर पाच तऱ्हेच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा आंब्याच्या झाडांची पाने रचून त्यावर नारळ (शेंडी वर करून) ठेवावा. 
तांब्याला चौरंग-पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवावं.
श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रीयंत्र असल्यास चित्र न ठेवता त्याची स्थापना करावी. 
त्यासमोर विडा, खारीक, बदाम व इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवून जवळ गणेश रूपी सुपारी मांडावी.
त्याजवळ 1 नाणं ठेवावं. हे नाणं उद्यापनापर्यंत पूजनास घ्यावयाचं व उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवावं. 
पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वत: आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी.
नैवेद्यासाठी केळे तसेच इतर फळे ठेवावी. एका वाटीत दूध नक्की ठेवावं. 
श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी किंवा श्रवण करावी.
नैवेद्य दाखवल्यावर श्रीमहालक्ष्मी देवीसमोर हात जोडून बसावे व 'श्री महालक्ष्मी नमनाष्टक' म्हणावे. 
आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी.
मग आरती करावी.
संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पित करावा.
गायीसाठी वेगळ्याने नैवेद्य काढून सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसादासह भोजन करावे. 
दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरांत निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी, विहीरी, तलाव किंवा तुळशी वृंदावनात ओतावे. 
नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळदकुंकू वाहून श्रीमहालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शुक्रवारची

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

Friday Upay for Daan शुक्रवारी हे दान करा आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवा

श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे? पारायणाची पद्धत आणि नियम, संपूर्ण माहिती

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments