Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अग्नी पंचक, नका करू हे 5 काम

Webdunia
मंगळवार, 12 जानेवारी 2016 (15:47 IST)
भारतीय ज्योतिषात पंचकाला अशुभ मानले गेले आहे. याच्या अंतर्गत धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद व रेवती नक्षत्र येतात. पंचकादरम्यान काही विशेष कामं करण्याची मनाई आहे. यंदा 12 जानेवारी, मंगळवारी रात्री 09.27पासून पंचक सुरू होणार आहे, जो 16 जानेवारी, शनिवारची रात्र 02.59पर्यंत राहणार आहे. मंगळवारी सुरू होत असल्यामुळे याला अग्नी पंचक म्हणू. पंचक किती प्रकारचे असतात आणि यात कुठले 5 कामं नाही करायला पाहिजे, हे जाणून घ्या.  
 
विद्वानांनुसार पंचक 5 प्रकारचे असतात -
1 . रोग पंचक
रविवारी सुरू होणारा पंचक रोग पंचक असतो. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. या पंचकात कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करणे वर्जित असते. शुभ कार्यांमध्ये हे पंचक अशुभ मानले जाते.  
 
2. राज पंचक
सोमवारी सुरू होणार्‍या पंचकाला राज पंचक म्हणतात. हे पंचक शुभ मानले जाते. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये सरकारी कामांमध्ये यश मिळतो. राज पंचकात संपत्तीशी निगडित कार्य करणे शुभ मानले जाते. 
 
3. अग्नी पंचक
मंगळवारी सुरू होणार्‍या पंचकाला अग्नी पंचक म्हणतात. या पाच दिवसांमध्ये कोर्ट कचेरी निर्णय, आपले हक्क मिळवण्याचे काम केले जातात. या पंचकात अग्नीचा भय असतो. हे अशुभ असते. या पंचकात कुठल्याही प्रकारचे निर्माण कार्य, औजार आणि मशीनरी कामांची सुरुवात करणे अशुभ मानले जाते. यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.  
 
4. चोर पंचक
शुक्रवारी सुरू होणारा पंचक चोर पंचक असतो. ज्योतिषांप्रमाणे या पंचकात प्रवास करण्याची मनाई असते. या पंचकात घेवाण-देवाण,  व्यापार आणि कुठल्याही प्रकारचे सौदे नाही करायला पाहिजे. आणि जर कार्य तुमच्या हाताने केले गेले तर धन हानी होणे निश्चित असते.  
 
5. मृत्यू पंचक
शनिवारी सुरू होणार्‍या पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात. नावाने ओळखले जाते की अशुभ दिवसापासून सुरू होणारे हे पंचक मृत्यूसमान त्रास देण्यासारखा असतो. या पाच दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे जोखीमपूर्ण काम नाही करायला पाहिजे. याच्या प्रभावामुळे विवाद, अपघात इत्यादी होण्याचा धोका असतो. 
 
पंचकात हे 5 काम करू नये.. 
त्या शिवाय बुधवार आणि गुरुवारी सुरू होणार्‍या पंचकात वर दिलेल्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे नसते. या दोन दिवसांमध्ये सुरू होणार्‍या पंचकात पाच कामांशिवाय इतर कुठले ही शुभ काम करू शकता.  
 
1. पंचकात जेव्हा घनिष्ठा नक्षत्र असेल तेव्हा गवत, लाकूड इत्यादी इंधन एकत्रित नाही करायला पाहिजे, याने अग्नीची भिती असते.  
2. पंचकाच्या दरम्यान दक्षिण दिशेत प्रवास करणे टाळावे, कारण दक्षिण दिशा, यमाची दिशा असते. या नक्षत्रांमध्ये प्रवास करणे धोकादायक ठरू शकते.  
3. पंचकात जेव्हा रेवती नक्षत्र सुरू असेल त्या वेळेस घराची छत नाही टाकायला पाहिजे, असे विद्वानांचे मत आहे. यामुळे धन हानी आणि  घरात क्लेश होतो.  
4. पंचकात पलंग तयार करणे देखील अशुभ मानले जाते. विद्वानांनुसार असे केल्याने फार मोठ्या संकट समोर येण्याची शक्यता आहे.  
5. पंचकात शवाचे अंतिम संस्कार करण्याअगोदर एखाद्या योग्य ब्राह्मणाचा सल्ला घ्यायला पाहिजे. जर असे नाही केले तर शवासोबत पाच पुतळे कणकेचे किंवा कुश (एक प्रकारचे गवत)ने बनवून अर्थीवर ठेवायला पाहिजे आणि या पाचींचे शवाप्रमाणे पूर्ण विधीने अंतिम संस्कार करायला पाहिजे, तेव्हा पंचक दोष समाप्त होतो. असे गरूड पुराणात लिहिले आहे.

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

Maa Baglamukhi Mantra तिन्ही लोकात शक्ती देतं माँ बगलामुखीचा मंत्र

आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

Show comments