Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुंभमेळयाचा मौलिक / मुलभुत अर्थ

Webdunia
मंगळवार, 14 जुलै 2015 (13:01 IST)
कुंभमेळा आध्यात्मिक, ज्ञान व आपल्या संस्कृतीचा संगम आहे. यात साधू, संत, भौतिक सुखांचा त्याग केलेले महात्मे प्रेम, एकात्मिकता, बंधुभाव, आध्यात्मिकता याचा प्रसार करण्यासाठी एकत्र येतात. हे सर्व गुण कधीही रिक्त न होणाऱ्या मानवी जीवनरुपी घटातून भाविकांपर्यंत पोहचतात. कुंभमेळयादवारे आपणास पृथ्वी, आपला निसर्ग, पवित्र नदया यांचे माहात्म्य समजते. कुंभमेळा हा निसर्ग व मानवी जीवनाचा संगम देखील आहे. कुंभमेळयामुळे आपला या महत्वाच्या गुणांवरील विश्वास पुनर्जिवित होऊन आपले मन व शरीरास सदगुणांची शाश्वत शक्ती प्राप्त होते. सुरवातीच्या काळात कुंभमेळयाचे स्वरुप लहान होते. कालानुरुप कुंभमेळा संपन्न होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी पुर्वीच्या कुंभमेळयापेक्षा सहभागी होणाऱ्या साधू व भाविकांची संख्या पुढील कुंभमेळयात अनेक पटीने वाढते आहे. रस्ते, दळणवळणाची साधने , इत्यादी मुलभुत सुविधांमध्ये झालेल्या विकासामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील साधू व भाविकांना कुंभमेळयात सहभागी होणे शक्य झाले आहे. कुंभमेळा केवळ लोकांची गर्दी अथवा जत्रा नसुन कुंभमेळा ज्ञान, आध्यात्मिकता, साधुत्व व समर्पणाचा सोहळा आहे. कुंभमेळयासाठी साधूग्राम, वाहनतळे आरोग्य व स्वच्छता व्यवस्था, विदयुत व्यवस्था, पाणी पुरवठा या सारख्या सुविधा लाखो साधु व भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात पुरविल्या जातात. कुंभमेळयातील सहभाग पवित्र असतो या विश्वासाने भाविक दुर दुरवरुन कुंभमेळयात सहभागी होतात. साधू व भाविकांची सेवा करण्याच्या हेतूने अन्न्‍ छत्र चालविणे, दान धर्म करणे, आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेत जीवरक्षक स्वयंसेवक म्हणून काम करणे या कार्यात भाविक सहभागी होतात. शासन व प्रशासनास देखील साधू व भाविकांच्या सुविधांशी निगडीत प्रत्येक गोष्टिचे सुक्ष्म नियोजन करावे लागते.

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

Show comments