Annapurna Jayanti 2023: शास्त्रांप्रमाणे मार्गशीर्ष पोर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रुपात अवतार घेतला होता म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती या रुपात साजरा केला जातो. या दिवशी आई अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. धार्मिक मान्यतेनुसार माँ अन्नपूर्णेचा निवास घराच्या स्वयंपाकघरात असतो असे मानले जाते. म्हणूनच असं म्हणतात की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये आणि ताटात खरकटं राहू देऊ नये, कधीही अन्नाचा अपमान करू नये. माँ अन्नपूर्णेच्या कृपेनेच सृष्टीचे पोषण होते. यंदा अन्नपूर्णा जयंती व्रत गुरूवारी 8 डिसेंबर रोजी पाळण्यात येणार आहे.
अन्नपूर्णा जयंती पूजा विधी
या दिवशी सकाळी सर्वप्रथम गंगेचे पाणी शिंपडून स्वयंपाकघर स्वच्छ करून पवित्र करावे. आता स्वयंपाकघराच्या पूर्व दिशेला एका चौकटीवर लाल कापड ठेवून त्यावर नवीन धान्याचा ढीग करून त्यावर माँ अन्नपूर्णेचे चित्र बसवावे आणि पाण्याने भरलेल्या तांब्याच्या कलशात अशोक किंवा आंब्याची पाने व नारळ ठेवावे. आता तुपाचा दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम देवी अन्नपूर्णेची रोळी, अक्षत, मोळी, फुले, फळे इत्यादींनी पूजा करावी. देवीची आरती करून देवीला मिठाई किंवा सुका मेवा अर्पण करावा आणि कथा करावी.
प्रचलित आख्यायिकेनुसार, एकदा काशीमध्ये दुष्काळ पडला आणि लोक उपासमारीने व्याकूळ झाले. तेव्हा भगवान शिवाने माता अन्नपूर्णा यांना लोकांना भोजन देण्याची विनंती केली होती. भिक्षासोबतच आईने भगवान शिवाला वचन दिले की काशीमध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही. काशीला येणाऱ्या प्रत्येकाला आईच्या आशीर्वादाने भोजन मिळते असेही म्हटले जाते.