Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तरकाशी बोगद्याची दुर्घटना कशी टाळता आली असती? बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स काय म्हणतात?

Arnold Dix
, बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (15:16 IST)
उत्तरकाशीतील बोगद्यात 17 दिवसांपासून 41 कामगार अडकल्याची घटना गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्यानं चर्चेत होती.त्यामुळे असा प्रश्नही उपस्थित होतो की, मजुरांच्या सुरक्षेसाठी अधिक चांगली व्यवस्था करता आली असती का? ही दुर्घटना टाळण्यासाठी काही करता आलं असतं का?
 
या प्रश्नांची उत्तरे बीबीसीने infracon.nic.in या सरकारी वेबसाइटवर शोधण्याचा प्रयत्न केला. या प्रकल्पाच्या प्रस्तावातून या प्रश्नांची उत्तरं काही प्रमाणात मिळू शकतात.
जून 2018 मध्ये तयार केलेल्या सिलक्यारा प्रकल्पाचा आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) काढून बीबीसीनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाला (NHIDCL) तिथं कोणत्या प्रकारचा बोगदा बांधायचा होता?
 
प्रकल्पाची वाढलेली किंमत
या माहितीच्या आधारे असं म्हणता येईल की सिलक्यारा वळणावर बरकोटचा दोन लेनचा बाय-डायरेक्शन बोगदा बांधणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
 
त्याच्या ऑपरेशन आणि देखभाल व्यतिरिक्त, यात राष्ट्रीय महामार्ग 134 च्या धारासू-यमुनोत्री विभागाच्या 25.4 आणि 51 किलोमीटर दरम्यान अप्रोच रोड आणि एस्केप पॅसेज (बाहेर पडण्याचे मार्ग) या बांधकामाचा समावेश होता.
 
2018 च्या अंदाजानुसार, 853 कोटी 79 लाख रुपये खर्च करून हा प्रकल्प 48 महिन्यांत पूर्ण करायचा होता
 
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंदाज समितीच्या अहवालात 2021 मध्ये या प्रकल्पाची किंमत 1383 कोटी 78 लाख रुपयांपर्यंत वाढल्याची नोंद आहे आणि बोगदा, एस्केप पॅसेज आणि अप्रोच रोड 8 जुलै 2022 पर्यंत बांधले जातील असं लिहिलं आहे.
 
एस्केप बोगदा बांधणे आवश्यक होते का?
इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशन ( आयटीयूएसए) चे अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स हे देखील या मदत कार्यात उपस्थित होते. ते रोज बोगद्याच्या आत जायचे आणि त्यांच्या अनुभवाचा वापर करुन बचाव कार्यात तांत्रिक मदत करत असतं.
 
मग अशा बोगद्यात एस्केप पॅसेज करणं आवश्यक आहे का?
अरनॉल्ड डिक्स म्हणतात, "माझे वैयक्तिक मत असं आहे की बोगदा बांधण्याच्या या टप्प्यावर एस्केप पॅसेज असणं आवश्यक नाही, कारण साधारणपणे ज्या बोगद्याचं बांधकाम सुरु असते, तो कोसळेल अशी तुमची अपेक्षा नसते."
 
"साधारणपणे जगभरात आपण आपले बोगदे या विचाराने बांधत नाहीत की ते या प्रकारे कोसळतील.
 
मुख्य बोगदा बनवण्याच्या शेवटी आपण एस्केप बोगदे बांधतो. जेणेकरून काही घटना घडल्यास बोगदा वापरणारे लोक त्यातून बाहेर पडू शकतील."
 
या प्रकल्पात एस्केप बोगदा बांधण्याचा प्रस्ताव आहे, असं विचारलं असता ते म्हणाले,
 
"माझ्या माहितीनुसार, ते अंतिम डिझाइनमध्ये आहे. पण जेव्हा आम्ही मुख्य बोगदा बांधत असतो तेव्हा आम्ही सहसा असं करत नाही.
 
काही युरोपियन देशांमध्ये आम्ही एक सर्विस बोगदा तयार करतो, ज्याचा वापर बाहेर पडण्यासाठी केला जाऊ शकतो, पण तो त्याचा मुख्य उद्देश नसतो."
 
अरनॉल्ड डिक्स म्हणतात, "पण आता इथे अशी घटना घडली आहे."
 
जेव्हा बीबीसीने अर्नोल्ड डिक्स यांना सिक्कीममधील जवळपास पूर्ण झालेल्या बोगद्याबद्दल सांगितलं.
 
ज्यामध्ये एक एस्केप बोगदा देखील आहे, तेव्हा अरनॉल्ड डिक्स म्हणाले, "मी तो बोगदा पाहिला नाही पण, हे शक्य आहे की भारताच्या अत्यंत जटिल भूगर्भिय स्थितीमुळे, तिथे एस्केप टनेल बनवत असतील. पण परदेशात आम्ही असं करत नाही."
 
बोगदा कोसळण्याचे कारण तपासले जात आहे का?
याबाबत इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स म्हणतात,
 
"मला माहिती आहे की या घटनेची अतिशय सखोल चौकशी केली जाईल, कारण संपूर्ण जग या घटनेकडे पाहत आहे आणि भारत देशही पाहत आहे. पण मला त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही."
 
आम्ही विचारलं की, बोगदा तज्ज्ञ म्हणून त्यांना या घटनेच्या कारणाचा तपास हवा आहे का?
 
यावर अर्नोल्ड डिक्स म्हणतात, "नक्कीच, अन्यथा हे सर्व व्यर्थ आहे. या घटनेतून आपण काही शिकलो नाही तर आपण काय मिळवलं? इतके पैसे खर्च करून आपण काय मिळवलं? फक्त तणाव आणि पैशाची उधळपट्टी आणि लोकांच्या जीवनातही तणाव आला."
अरनॉल्ड डिक्स म्हणतात, "माझ्या मते, तपास पथक पहिल्या दिवसापासून यात गुंतलं आहे. कारण ही घटना अगदी सामान्य नाही. तपास पथक इथं आहे. मी त्या पथकामध्ये नाही. आपत्तीकाळात मी या पथकासोबत होतो. पण या घटनेच्या तपास मी नाही."
 
वेगळे तंत्र वापरायला हवे होते का?
याबाबत डिक्स म्हणतात, "आम्ही साधारणपणे खडकाची रचना पाहतो आणि त्यानुसार त्या खडकासाठी सपोर्ट सिस्टिम बनवतो.
 
बचाव कार्यासाठी टाकल्या जाणाऱ्या पाईपलाईनसाठी खोदकाम करताना जाळी आणि लोखंडी तुकडे वारंवार आल्याचं वाचत असाल तर ते बांधकामात वापरले जाणारे लोखंडी गर्डर आहेत.
 
साधारणपणे, लॅटिस गर्डर म्हणजे जाळीचा गर्डर बोगद्यासाठी वापरला जातो, तो सिंगल पीस लोखंडापासून बनलेल्या ISMB गर्डर पेक्षा वेगळा असतो.
 
या दोन्ही प्रकारच्या गर्डरचा उद्देश बोगदा कोसळण्यापासून रोखणे हा आहे.
 
मग या दोघांमधील चांगला गर्डर कोणता?
 
या प्रश्नावर डिक्स म्हणतात, "सर्वसाधारणपणे आपण खडकाचा प्रकार आणि त्यानुसार त्या खडकाची सपोर्ट सिस्टीम ठरवतो.
 
मला असं दिसतं की हिमालयात एक असामान्य परिस्थिती निर्माण होत आहे, जिथे खडकाचा दर्जा बदलत आहे आणि त्याचा तपास करणं आवश्यक आहे, कारण जो भाग कोसळला आहे तो यापूर्वी कधीही कोसळला नव्हता आणि त्याच्या कोसळण्याचे कोणतेही संकेत दिले नव्हते."
 
या बोगद्यात एस्केप पॅसेज होता का?
"आमच्यासमोर आव्हान हे जाणून घेण्याचं आहे की या पर्वतात असं काय आहे की ज्याने आमच्यावर अशी परिस्थिती ओढवली. या बोगद्यात झालेलं बांधकाम अपेक्षेप्रमाणे का टिकू शकलं नाही?
 
जर बोगद्यात ग्राउटिंग (भेगा दुरुस्त करण्याचं काम) चालू असेल, तर कामगारांनी ग्राउटिंगच्या ठिकाणाहून पुढे बोगद्याच्या आत जावं की नाही हादेखील एक प्रश्नच आहे?"
 
याबद्दल अरनॉल्ड डिक्स म्हणतात, "मला याचा ताण जाणवणार नाही कारण मला बोगदा कोसळेल असं वाटत नाही.
 
साधारणपणे आपण बोगद्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो आणि त्यांच्यात आपापसात समन्वय ठेवला जातो, पण माझ्या अनुभवानुसार, बोगद्यात एका ठिकाणी काही काम होत असेल तर इतर ठिकाणच्या लोकांच्या तिथे जाण्यास बंदी असल्याचं मी कधीही पाहिलं नाही."
सिलक्यारा बोगदा प्रकल्पाशी संबंधित एका सरकारी दस्तऐवजात एस्केप पॅसेज बनवण्याचा उल्लेख होता, म्हणून जेव्हा आम्ही एनएचआयडीसीएलचे एमडी महमूद अहमद यांना विचारलं की बोगद्याच्या 'डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट' (डीपीआर) मध्ये देखील एस्केप पॅसेजची योजना आहे? किंवा नाही?
 
या प्रश्नाच्या उत्तरात अहमद म्हणाले ,"तुम्ही विचारलेला प्रश्न आमच्याही मनात आहे. समिती स्थापन केली आहे, त्याचे निष्कर्ष समोर येतील. "
 
आमचे पहिले उद्दिष्ट आमच्या 41 सहकाऱ्यांना बाहेर काढणं हे आहे. तुमच्या मनात जो प्रश्न आहे तो आमच्याही मनात आहे आणि त्याबाबत विचार केला जाईल.
 
बीबीसीने या समितीने काम सुरु केलं आहे का असा प्रश्न विचारला तेंव्हा महमूद अहमद यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

BCCI : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच राहणार, बीसीसीआयची घोषणा