Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिंदू धर्मानुसार घरामध्ये चप्पल, बूट घालू नये

Webdunia
शनिवार, 23 जुलै 2022 (23:07 IST)
आजकाल अनेकजण घरात स्लीपर्स किंवा जोडे घालूनच वावरताना दिसतात. प्राचीन काळापासून आपल्याकडे घरी पादत्राणे वापरू नका असे सांगण्यात आल्याचे दिसते. स्वत:ला पुढारलेले समजणारे प्रामुख्यने घरात चपला वापरताना दिसतात, हे आश्चर्यच आहे.
 
असो. घरात चपला घालून वावरू नये कारण आपण बाहेरून घरात येतो तेव्हा आपल्या चपलांबसोबत घाणही येते. असे असताना आपण घरात चपला घालून येण्याने घरातही घार पसरते. असे होणे घरातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ठीक नसते. या घाणीत रोगराई पसरवू शकणारे जंतू असू शकतात. यामुळे घरात चप्पल घालून फिरणे योग्य नाही. 
 
याशिवाय यामागे धार्मिक कारणही आहेच. घर म्हणजे देवी देवतांचे स्तान मानले गेले आहे. आपण राहतो तेथे दैवी शक्तीचाही वास असतो. असे असताना घरात चपला घालून फिरणे म्हणजे देवतांचा अपमान तर आहेच, शिवाय आपण घराचे पावित्र्यही घालवून बसतो. ज्या घरात पावित्र्य असते तिथे स्थायी रूपाने देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे घराचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे. घरात बिना पादत्राणे राहिल्याने त्यानिमित्ताने पायातील अनेक महत्त्वाच्या बिंदूवर दाब पडतो आणि यामुळे अनेक रोग दूर होतात.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments