Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऐरावत हत्ती ऐश्वर्याचे प्रतीक, स्वप्नात दिसल्यास होईल धनाची वर्षा

ऐरावत हत्ती ऐश्वर्याचे प्रतीक, स्वप्नात दिसल्यास होईल धनाची वर्षा
ऐरावत हत्ती हे नाव देखील ऐकल्यावर ऐश्वर्य आणि सौभाग्य जाणवतं. ऐरावत खरोखरच इंद्राच्या हत्तीचे नाव आहे. ज्योतिष शास्त्रांप्रमाणे स्वप्नात हत्ती बघणे शुभ आणि हितकारी मानले गेले आहे. जर तुम्हीही स्वप्नात हत्ती बघितला असेल तर जाणून घ्या त्यामुळे मिळणारं फल- 
 
स्वप्नात हत्ती दिसणे ऐश्वर्य आणि सौभाग्य वृद्धीसह सुख-समृद्धीचा सूचक आहे.
 
जर स्वप्नात आपण हत्तीवर स्वारी करता बघत असाल तर हे घरात सुख-शांती, वैभव-वृद्धी, कुटुंबाच्या वृद्धीचे संकेत आहे.
 
स्वप्नात हत्तीचं जोडपं दिसल्यास दांपत्य जीवनात सुख येण्याचे संकेत आहे.
 
ऐरावत हत्ती दिसल्यास यशात वृद्धी, किंवा चांगली कामगिरी किंवा सन्मान प्राप्तीचे शुभ संयोग बनत असल्याचे संकेत आहे.
 
गर्भवती स्त्रीच्या स्वप्नात हत्ती आल्यास भाग्यशाली संतान आगमनाचे योग बनतात.
 
स्वप्नात मस्त झूमत असलेला हत्ती धनवृद्धी होण्याचे संकेत देतं.
 
जर आपण स्वप्नात हत्ती द्वारा हल्ला करणे किंवा हत्तीला घाबरत असाल तर याचा अर्थ येणार्‍या कठिण परिस्थिती सामोरा जाऊन आपल्याला पुढे वाढण्याचे आहे.
 
स्वप्नात हत्तींचा कळप दिसल्यास आपल्याला अपार धन वृद्धी होण्याचे संकेत आहे.
 
आपल्या स्वप्नात केवळ एकटा हत्ती दिसल्यास हे स्वप्न आपल्याला साधारण जीवन जगण्याचा सल्ला देतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येथे श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते