Festival Posters

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2025 (15:29 IST)
घरात लग्न असले की वेगळीच लगबग सुरु असते. या साठी पूर्व तयारी करावी लागते. लग्न म्हटले की सर्वात आधी येते ती मुला मुलीच्या पत्रिकाची जुळवणी. नंतर मुला मुलीची पसंतापसंती. नंतर सर्व गोष्ठी मनाप्रमाणे झाल्या की ठरतो साखरपुड़ा किंवा साक्षगंध. साखरपुड़ा करून लग्न पक्के केले जाते.
ALSO READ: लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या
या विधिसाठी वर मंडली वरासह कन्येच्या घरी जातात आणि वरासाठी कन्येची मागणी करतात किवा वधु पक्ष वर पक्षाकडे जाऊन वराची मागणी घालतात.नंतर दोन्ही पक्षांकडून होकार आल्यावर लग्न ठरल्याचे जाहिर केले जाते. साखरपुड़ा हा लग्नापूर्वीचा महत्त्वाचा विधि आहे. विवाहित स्त्रिया भावी वर वधूचे औक्षण करतात. वराची आई मुलीची ओटी भरतात मुलीला साडी, चोळी, बांगड्या, कुंकु अणि नारळ, फळे, खडीसाखरेचा पुडा देतात.
ALSO READ: मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak
तसेच मुलीच्या घरचे मंडली मुलाला कपडे, नारळ देतात. दोन्ही पक्षांकडून मुलासाठी व मुलीसाठी अंगठ्या ठेवतात. मुलगा व मुलगी सर्व वडीलधाऱ्यांच्याआशीर्वाद घेऊन एकमेकांना अंगठ्या घालतात.अशा प्रकार साखरपुड़ाविधि पूर्ण होतो. 

साखरपुडयाला लागणारे साहित्याची यादी- 
वधु  पक्षासाठी - हळद कुंकु, तेल, तूप, आसन, पाट, समई, निरंजन, घंटी, पळी, ताम्हण, तांब्याचे तांबे, ताट, उपरणं, टोपी, विड्याचे पाने, आंब्याचे डहाळे, अखंड सुपाऱ्या, नारळ, तांदूळ, वाटीभर साखर, सुटे पैसे, फळे पूजेसाठी.
 
वर पक्षाकडून लागणारे साहित्य : ओटीचे सामान, बदाम, खारीक, अक्रोड, सुपाऱ्या, हळकुंडे प्रत्येकी पांच ओटीसाठी पाच प्रकारची फळे, तांदूळ किंवा गहू, साडी-चोळी, अंगठी, पेढ्यांचा पुडा, विड्याची पाने, सुपारी 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती सोमवारची

Shri Kashi Vishwanath Stotram श्री काशीविश्वनाथ स्तोत्रम्

Narmada Jayanti 2026: नर्मदा जयंती तिथी, पूजा विधी, कथा आणि संपूर्ण माहिती

रथ सप्तमी व्रत कथा

Ratha Saptami 2026 : रथ सप्तमी कधी? शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments