Marathi Biodata Maker

घाणा भरणे आणि हळद समारंभ

Webdunia
सोमवार, 3 मार्च 2025 (21:37 IST)
घाणा भरणे -
हा समारंभ वधू आणि वराचा घरी हळदीच्या दिवशी केला जातो. धान्य काढण्याच्या विधीला घाणा भरणे असे म्हणतात. या विधी साठी हळदीत बुडवलेला स्वच्छ कापड त्यात हळकुंड, सुपारी आणि पैसा बांधून  मुसळ ला आणि जात्याला बांधतात. वधू आणि वराला आई वडिलांसह गव्हाचे चौक काढून त्यावर बसवतात. त्यांचे औक्षण करतात . पाच सवाष्णी वर आणि वधूचे आई वडील टोपलीत  गहू, हळकुंड, सुपारी घालून कुटतात आणि जात्यात गहू घालून दळतात. अशा प्रकारे वर आणि वधूच्या सांसारिक जीवनाची इथून सुरुवात केली जाते. नंतर घाणा भरणाऱ्या सवाष्णींना हळद कुंकू लावून ओटी भरतात. नंतर मुलीचे आई वडील व मुलाच्या आई वडिलांना पाटावर बसवून सुवासिक तेल लावून उटणे लावतात.
ALSO READ: मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा
हळदीचा विधी -
नंतर हळदीच्या विधीला सुरुवात केली जाते.हा विधी कार्यालयात केला जातो. हा कार्यक्रम आधी वधू पक्षाकडे केला जातो. सकाळी वधूच्या आई वडिलांना तेल उटणे लावून त्यांना पाण्यात भिजवून पेस्ट केलेली हळद विडाच्या पानाने पायापासून डोक्यापर्यंत लावली जाते. या प्रसंगी गाणे देखील म्हणतात. नंतर त्यांना स्नान घालतात. 
ALSO READ: केळवण आणि ग्रहमख
नंतर ही उष्टी हळद घेऊन सवाष्णी गाजत वाजत वर पक्षाकडे जातात आणि तिथे वराला आणि त्याचा आई वडिलांना अशाच प्रकारे हळद लावण्याचा कार्यक्रम केला जातो. तसेच इतर नातेवाईकांना हळद लावली जाते. नंतर वर पक्षाकडून कडून वधू पक्षाच्या हळद घेऊन आलेल्या सवाष्णींनीची ओटी भरली जाते. वर पक्ष कडून वधू साठी हळदीची साडी दिली जाते. अशा प्रकारे हळदीचा आणि घाणा भरण्याचा समारंभ केला जातो. 
 
 Edited By - Priya Dixit
ALSO READ: साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारी करा आरती सूर्याची

Bhanu Saptami 2026 रविवारी भानुसप्तमी, 4 राजयोग, या 3 राशीच्या जातकांसाठी शुभ

Narmada Aarti in Marathi नर्मदा आरती मराठीत

Ratha Saptami 2026 रथ सप्तमी बद्दल संपूर्ण माहिती

शनिवारची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments