Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केवळ 5 भारतीय परंपरा स्वीकारा... घातक विषाणूंपासून स्वतःचे रक्षण करा

केवळ 5 भारतीय परंपरा स्वीकारा... घातक विषाणूंपासून स्वतःचे रक्षण करा
, मंगळवार, 24 मार्च 2020 (16:52 IST)
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपली परंपरा आणि आयुर्वेदात अश्या सूचना आणि उपाय दिले गेले आहे जेणेकरून आपण कोणत्याही प्रकाराचं जिवाणू, विषाणू संसर्ग टाळू शकतो. त्याचा पासून स्वतःला वाचवू शकतो. 
 
हे तर प्रत्येकाला ठाऊक आहे की हाताचा संपर्क न करता आपण अभिवादनाचं अनुसरण केले पाहिजे. त्याच बरोबर स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. हे काही उपाय जे आपले कोरोनाच्या संसर्गापासून आपले रक्षण करतील. चला तर मग जाणून घेऊ या कोणते आहे हे उपाय-
 
1 उपवास- संपूर्ण दिवस उपवास करावा जेणे करून आपल्या आतील विषाणूचे उत्सर्जन होईल आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढेल. आपण नारळपाणी घ्यावे. बाळ हरड (हरितकी)च्या सेवनाने आपल्या शरीरातील विषारी पदार्थांचं उत्सर्जन होतं. 
 
2 प्राणायाम- फुफ्फुसांची क्षमता वाढविण्याचे काम प्राणायाम करतं. कोरोनाचे विष्णू सर्वप्रथम आपल्या फुफ्फुसांना संसर्गित करतं. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. फुफ्फुस सक्रिय असल्यास विषाणूंवर मात करता येऊ शकते. 
 
घरातच राहून पूरक म्हणजे श्वास घेणे, कुंभक म्हणजे श्वास आतमध्ये रोखणं, आणि रेचक म्हणजे श्वासोच्छ्वास हळू -हळू सोडण्याची प्रक्रिया. पूरक, कुंभक आणि रेचकाची प्रक्रियेस समजून घेऊन दररोज प्राणायाम केल्याने हा रोग नाहीसा होतो. ह्याच बरोबर कपालभाती, भ्रामरी, भ्रस्तिका केल्याने शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढते.
 
3 तुळशीचा रस - तुळसही प्रत्येक घरातच आढळते. तुळशीचे गुणधर्म सर्व प्रकाराच्या जंतूंचा नायनाट करणे आहे. त्याच बरोबर ह्याचे नियमाने सेवन केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. त्याच बरोबर कापराचा किंवा कडुलिंबाच्या पाल्यांचा धूर केल्याने पण जंतू नाहीसे होतात आणि रोगराही पसरत नाही.
 
4 सूर्य नमस्कार- घरातच आपण दररोज 12 सूर्य नमस्कार 12 वेळा केल्यास रोगाशी लढण्यास सज्ज राहाल आणि कोणतेही विषाणूंचा आपल्या शरीरांवर दुष्परिणाम होणार नाही.
 
5 जैन परंपरा- ज्या प्रमाणे जैन धर्मात श्वेतांबर मुनी स्वतःच्या तोंडावर पांढरे कपडे बांधतात त्याला मुखपत्र म्हणतात. एका पांढऱ्या कापड्याची घडी घालून त्याला दोऱ्याच्या साहाय्याने घट्ट बांधला जातो आणि हे कापड तोंडाला लावले जाते. हे मुखवटाचे कार्य करतं. 
 
पूर्णपणे शाकाहार पद्धत पाळणे योग्य ठरेल. तसेच सूर्यास्तापूर्वी जेवण करणे फायदेशीर ठरेल. आयुर्वेदात सांगितले आहे की सूर्यास्तापूर्वी जेवण करावे. जैन धर्मास या नियमास महत्त्व दिले जाते आणि पाळले देखील जाते. सूर्यास्तापूर्वी जेवण केल्याने शरीरातील पचनतंत्र ठीक राहते. अन्नाचे पचन सकाळपर्यंत व्यवस्थित होते आणि शरीराचं रोगराही पासून रक्षण होतं. रात्रीच्या वेळेस अनेक विषाणू आणि अन्य जंत आपल्या अन्नास चिटकून जातात. तिथेच ते जन्मतात. रात्रीच्या वेळी अन्नात दूषित आणि शिळे होण्याची प्रक्रिया झपाट्याने होते. शाकाहारी आणि पौष्टिक अन्नच आपल्याला विषाणूंशी लढण्यास आपले रक्षण करतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनामुक्त भारतासाठी यंदा गुढी : मोहन दाते