Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

नैवेद्य कसा दाखवावा?

Ram Mandir Prasad
, गुरूवार, 27 मार्च 2025 (15:52 IST)
कोणतेही सण-वार असो किंवा एखादे मनासारखे कार्य पार पडल्यावर देवाला नैवेद्य अर्पण करण्याची एक धार्मिक प्रक्रिया आहे. याद्वारे आपण देवतेच्या चरणी अन्न अर्पण करतो. या लेखात आ‍म्ही देवतेला किंवा संतांना कशा प्रकारे नैवेद्य अर्पण करावा ते सांगणार आहोत आणि त्याची योग्य पद्धत तसेच महत्त्व काय हे देखील सांगणार आहोत. नैवेद्य अर्पण केल्याने आध्यात्मिक प्रगती साधता येते. नैवेद्य दाखवल्याने जीवनात सुख-समृद्धी नांदते आणि आरोग्य चांगले राहते.
 
नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत काय?
नैवेद्य अर्पण करण्यासाठी सर्वप्रथम इष्ट देवतेच्या मूर्ती समोर पाणी टाकून त्यात तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवावा.
नंतर ताटावर अन्न वाढून त्यावर तुळशीपत्र ठेवावे. अन्न वाढताना गोड पदार्थ डाव्या बाजूला आणि तिखट पदार्थ उजव्या बाजूला असावेत.
नैवेद्य अर्पण करताना पाणी तीन वेळा ताटावरुन फिरवून गायत्री मंत्र उच्चारावे. यामुळे देवतेची दिव्य ऊर्जा अन्नात प्रवेश करते.
नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवतेची दिव्य ऊर्जा अन्नामध्ये येते. आता याचा प्रसाद होतो. हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर भक्तांना शांती, संतुष्टी आणि आशीर्वाद लाभतो.
ठराविक पदार्थ तयार करणे शक्य नसल्यास दूध- साखर, गूळ, किंवा दहीभात यासारखे साधे पदार्थ अर्पण करता येतात.
दररोज देवतेला नैवेद्य अर्पण केल्याने देवतेशी एक नियमित संबंध स्थापित होतो.
प्रसाद ग्रहण केल्याने भक्ताच्या आध्यात्मिक प्रगतीस मदत होते. अशाने मनुष्याच्या जीवनात शांती, समृद्धी आणि आशीर्वादाचा मिळतो.
नैवेद्य अर्पण करताना बोलायचे मंत्र
१. गायत्री मंत्र:
“ॐ भूर्भव: स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।”
 
२. पंच प्राण मंत्र:
“ॐ प्राणाय स्वाहा
ॐ अपानाय स्वाहा
ॐ व्यानाय स्वाहा
ॐ उदानाय स्वाहा
ॐ समानाय स्वाहा
ॐ ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा।”
 
हे मंत्र नैवेद्य अर्पण करताना उच्चारले जातात, ज्यामुळे देवतेच्या कृपेची प्राप्ती होते आणि आशीर्वाद मिळतात.
 
नैवेद्य अर्पण करतान मनात अतिशय पवित्र भावना, श्रद्धा, विश्वास आणि भक्ती असावी. या क्रियेमुळे देवतेची ऊर्जा अन्नात प्रवेश करते आणि ती प्रसाद म्हणून भक्तांनी ग्रहण केल्यावर त्याचा लाभ होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gudi Padwa Recipe Amrakhand घरीच तयार करा आम्रखंड