गणपती हे बुद्धीचे देव आहे. कोणत्याही कार्याच्या चांगल्या फलश्रुतीसाठी आधी गणपतीचे स्तवन केले जाते. घरात गणेश यंत्राची स्थापना करावी.
विघ्नहर्ता आणि सुखकर्ता अशा श्रीगणेश यंत्राचा प्रचार जगभर झाला आहे. गणेश यंत्र तांब्याच्या प्रतिमेच्या स्वरूपाने करून पूजेत ठेवावी. यंत्राच्या स्थापनेच्या वेळी यंत्रास स्नान घालून त्यास चंदन, लाल फुलं, मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नेवैद्य दाखवावा. यंत्राची स्थापना विनायकी किंवा संकष्टी चतुर्थीला करावी.
ॐ गं गणपतये नम: मंत्राचा जाप 108 वेळा न चुकता करावा. गणेश यंत्र पूजेन केल्याने अडखळून पडलेले विवाह, घराची कामे, आर्थिक स्थैर्यता, धनलाभ, नोकरी, प्रमोशन, सारख्या गोष्टही अनुकूल घडतात.
लहान मुलांनी दररोज गणेशाची प्रार्थना करावी आणि रोज सकाळ- संध्याकाळ गणपती अथर्वशीर्ष पठण आणि स्तवन करावे.