Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

का पडतात श्री जगन्नाथ भगवान प्रत्येक वर्षी आजारी?.....

Webdunia
गुरूवार, 4 जुलै 2019 (12:21 IST)
आजपासून जगन्नाथ जी आजारी पडतात पुढचे 15 दिवस... ...... 15 दिवसा नंतर होते  जगन्नाथ रथ यात्रा ।। त्याची कथा.
 
का पडतात श्री जगन्नाथ भगवान प्रत्येक वर्षी आजारी?.....
 
उड़ीसा प्रांतात जगन्नाथ पुरीमध्ये एक भक्त राहतं होते, श्री माधव दास. ते एकटे राहतं होते, संसाराशी त्यांना काहीही घेणंदेणं नव्हत.
 
एकटे बसून ते भजन करायचे, नित्य प्रति श्री जगन्नाथाचे दर्शन करत होते. प्रभूलाच आपला सखा मानत होते. प्रभू बरोबर च खेळत होते. 
 
प्रभू ही त्यांच्या बरोबर अनेक लीलाए करत होते | भक्त माधव दास जी आपल्या मस्तीत मग्न राहतं होते |
 
एकदा माधव दासजीं ना अतिसार( उलटी – दस्त )ची व्याधी झाली। ते इतके दुर्बल झाले की उठणं-बसणं देखील त्यांना अशक्य झाले, जो पर्यंत होईल तोपर्यंत आपले कार्य ते स्वयं करत होते. कोणाकडून सेवा घेत नव्हते।
 
कोणी म्हणत महाराजजी आम्ही करून देतो तर म्हणत नको माझा तो एक जगन्नाथ ही आहे तो माझी रक्षा करेल । अश्या दशेत त्यांचा रोग जसा वाढत गेला तसे  उठणं-बसणं देखील त्यांस अशक्य झाले. 
 
तेव्हा जगन्नाथजी स्वयं सेवक बनून त्यांच्या घरी पोहचले आणि माधवदासजी ला म्हणाले की मी तुझी सेवा करतो।
 
भक्ता साठी भगवंत काय नाही करत... ..
कारण माधवदास चा रोग इतका वाढला होता की त्यांना कळतंही नव्हते की केव्हा मल मूत्र त्यागले। त्यांचे वस्त्र घाण होत होते. 
 
त्या वस्त्रांना जगन्नाथ भगवान आपल्या हातानं साफ करते होते. त्यांचे अंग देखील साफ करत होते. स्वच्छता करत होते।
 
कोणी इतकी सेवा नाही करू शकणार जितकी जगन्नाथ भगवान भक्त माधव दास जीं ची करीत होते ।
 
जेव्हा माधवदासजी शुद्धीत आले, तेव्हा त्यांनी तुरंत ओळखलं की हे तर माझे प्रभू आहेत!
एक दिवस श्री माधवदासजी ने विचारले भगवंताला की....
“प्रभू आपण तर त्रिभुवनाचे स्वामी आहात, आपण माझी  सेवा करत आहात, आपण ठरवलं तर माझा रोग तर तुम्ही सहज दूर करू शकत होतात, रोग दूर केला असता तर हे सगळं करण्याची गरजच नव्हती". 
 
भगवंत् म्हणाले.. हे बघ माधव! माझ्या नी भक्तांचे कष्ट नाही सहन होत, ह्या कारणा ने तुझी सेवा मी स्वयं केली। जे प्रारब्द्ध आहे ते तर भोगण्याचे आहेच। ते कोणीही टाळू शकत नाही.
 
जर ते भोगले नाही या जन्मात तर परत भोगण्यासाठी परत तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल आणि माझी इच्छा नाही की माझा भक्ताला या प्रारब्द्धा मुळे पुढचा जन्म परत घ्यावा लागावा.
 
या साठी मी तुझी सेवा केली, परंतु जर तू म्हणत असशील तर, भक्ताचे म्हणणं देखील मी टाळू शकत नाही.  
 
आता तुझ्या प्रारब्द्धामधे 15 दिवसाचा रोग बाकी आहे, त्या करता 15 दिवसाचा रोग तू मला दे.
15 दिवस तो रोग जगन्नाथजींनी माधवदास कडूनं घेतला.
 
आज ही या कारणामुळे जगन्नाथ भगवान आजारी पडतात .....
 
ही झाली त्या वेळेची कहाणी. परंतु भक्त वत्सलता तर पहा आज ही वर्षात एकदा जगन्नाथ भगवानाला स्नान करवले जाते (ज्याला स्नान यात्रा म्हणतात)
 
स्नान यात्रा झाल्या नंतर प्रत्येक वर्षी 15 दिवस आजही जगन्नाथ भगवान आजारी पडतात ।
 
15 दिवस मंदिर बंद केले जाते. कधीच जगन्नाथ भगवान चे स्वयंपाक घर बंद नसते परंतु या 15 दिवसा साठी ते बंद ठेवले जाते. 
 
भगवंताला 56 भोगाचा नैवेद्य दाखवला जात नाही. (कारण आजाराचे पथ्य) 
 
प्रभूला काढ्याचा नैवेद्य दाखवला जातो. ........
 
15 दिवस जगन्नाथ धाम मंदिरात भगवानच्या आजारपणाची चिकित्सा करण्यास रोज वैद्य येतात.
 
काढ़्या व्यतिरिक्त 
फळांचा रस ही दिला जातो. रोज शीतल लेप लावला जातो. आजारपणात रोज रात्री झोपण्याआधी गोड  दूध अर्पित केले जाते.
 
भगवान जगन्नाथ आजारी झाले आहेत आणि आता 15दिवसा पर्यंत आराम करतील। आराम साठी 15 दिवसापर्यंत मंदिराचे पट बंद राहतात आणि त्यांची सेवा केली जाते। जेणेकरून ते लवकर ठीक व्हावे.
 
ज्या दिवशी ते पूर्णं ठीक होतात त्या दिवशी जगन्नाथ यात्रा निघते ज्यासाठी जगभरातून दर्शन हेतू असंख्य भक्त पुरीला येतात. 
 
स्वतः त्रास सहन करून आपल्या भक्ताचे जीवन सुखमयी करणारा तो एकमेव भगवंतच असू शकतो ।।
 
जय जगन्नाथ जी

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

वज्रकाया नमो वज्रकाया

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

आरती शुक्रवारची

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

दत्त स्तुती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments