Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करिदिन संपूर्ण माहिती

करिदिन संपूर्ण माहिती
, बुधवार, 15 जानेवारी 2025 (05:16 IST)
भारतीय परंपरेत करिदिन हा अशुभ दिवस असल्याचा मानला जातो. या दिवशी कुठलेही मांगलिक कार्य केले जात नाही. संपूर्ण वर्षभरात एकूण ७ करिदिन पाळला जातो. या दिवशी काही नियम पाळले जातात. मकरसंक्रांत आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी करिदिन पाळला जातो. या दिवशी कोणासोबतही वाद टाळावे. कोणतेही महत्त्वाचे कार्य या दिवसापासून सुरु करु नये. 
 
करिदिन या शब्दाचा विग्रह केला तर दोन शब्द दिसतात करी म्हणजे अशुभ आणि दिन म्हणजे दिवस म्हणूनच मराठीमध्ये करि दिनाला अशुभ दिवस असे म्हटले जाते. एकूण सात करिदिन दिवसांपैकी एक करीदिवस मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असतो. 
 
७ करिदिन
करिदिन हा पंचांगात मधील एक अशुभ दिवस असतो. करिदिन एकूण ७ आहेत. 
 
१. भावुका अमावस्येनंतरचा दुसरा दिवस
२. दक्षिणायनारंभानंतरचा दुसरा दिवस (याला अयन करिदिन म्हणतात.)
३. उत्तरायणारंभानंतरचा दुसरा दिवस (याला अयन करिदिन म्हणतात.)
४. चंद्रग्रहण वा सूर्यग्रहण यानंतरचा दुसरा दिवस
५. कर्क संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस
६. मकरसंक्रांतीनंतरचा दुसरा दिवस (हा दिवस किंक्रांत या नावाने परिचित असतो.)
पौराणिक कथा
फार वर्षांपूर्वी संकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा ददेत असे. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही.
 
किंक्रांत म्हणजे काय
संक्रांतीचा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी भोगीची भाजी, बाजरीची भाकरी असा बेत केला जातो. भोगीचा पुढचा दिवस मकर संक्रांति असते. या दिवशी सवाष्ण बायकांना बोलवून हळदी कुंकू समारंभ करून इच्छेनुसार सवाष्णींना वाण दिले जाते. या काळात लहान मुलांचे बोरन्हाण देखील केले जाते. संक्रांतीच्या दिवशी आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ म्हणजेच तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा आणि स्त्रियांना वाण देऊन 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याच्या शुभेच्छा देतात.
मकर संक्रांति चा दुसरा दिवस किंक्रांत किंवा करिदिन म्हणून साजरा केला जातो
या दिवशी कोणतेही शुभ काम करणे निषिद्ध मानले आहे. या दिवशी देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचे वध केले होते. देवीआईची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही ठिकाणी प्रवास करत नाही. दक्षिण भारतात मकर संक्रांतीचा दुसरा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गाई- बैलांना स्नान घालून त्यांची पूजा करून गोडधोडाचा जेवण देतात आणि संध्याकाळी गावात मिरवणूक काढतात. या दिवशी देखील बायका हळदी कुंकू करतात. संक्रांतीचा सण रथसप्तमी पर्यंत साजरा केला जातो. बायका हळदी- कुंकूचा समारंभ रथ सप्तमी पर्यंत करतात. 
 
किंक्रात या दिवशी बेसनाचे धिरडे करण्याचा देखील प्रघात आहे. तर चला रेसिपी जाणून घ्या-
 
साहित्य- 2 कप बेसन, एक कांदा चिरलेला, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 1 टीस्पून चाट मसाला, अर्धा चमचा टीस्पून लाल तिखट, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ,तेल
 
कृती- एका भांड्यात बेसन चाळून घ्या. त्यात कांदा, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर, लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ घालून मिक्स करा. आता बेसनात थोडे पाणी घालून त्याचे द्रावण तयार करा. त्यात गुठळ्या पडता कामा नये. यानंतर गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करा. तव्यावर तेल टाकून ग्रीस करा. नंतर बेसनाचे मिश्रण तव्यावर ओतून चमच्याने गोल व पातळ पसरावे. आता वरील बाजूला तेल शिंपडावे नंतर ते उलटावे. धिरडं दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या. एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याचप्रमाणे सर्व धिरडे तयार करा. गरमागरम  धिरडे सॉस, चटणी किंवा लोणचेसोबत सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरठण खंडोबा Korthan Khandoba