Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोजागिरीला ग्रहणामुळे आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा की नाही ?

Webdunia
Kojagiri Purnima 2023 Chandra Grahan हिंदू पंचागानुसार आज चंद्रग्रहण आणि शरद पौर्णिमा असा विशेष योगायोग आहे. पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने विशेष फायदा होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. याशिवाय या दिवशी दान करण्यालाही विशेष धार्मिक महत्त्व आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याचीही परंपरा आहे. आज चंद्रग्रहण होत असताना अनेकांच्या मनात शंका आहे की या दिवशी दूध अर्पण केले जाईल की नाही? चला जाणून घेऊया शरद पौर्णिमेला चंद्रग्रहणाच्या वेळी आटीव दुधाचा नैवेद्य दाखवता येईल की नाही?
 
शरद पौर्णिमेला चंद्र देव 16 कलांनी भरलेला
शरद पौर्णिमेबाबत शास्त्रीय समज आहे की या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. तसेच यावेळी चंद्र देव आपल्या 16 कलांनी युक्त पृथ्वीवर अमृताच्या थेंबांचा वर्षाव करतो. यामुळेच दूध चंद्राला अर्पण केली जाते. मग तो नैवेद्य मोकळ्या आकाशाखाली ठेवला जातो, म्हणजे चंद्राच्या किरणांचे अमृत त्या नैवेद्यावर पडते आणि ते अमृत बनते.
 
शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 28 ऑक्टोबरला पहाटे 4.17 वाजता सुरु झाली असून पौर्णिमा तिथीची समाप्ती रविवार 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजून 53 मिनिटाला होईल. अशा स्थितीत उदय तिथीच्या मान्यतेनुसार 28 ऑक्टोबरलाच शरद पौर्णिमा साजरी केली जाईल.
 
शरद पौर्णिमेला दूध कधी आटवण्याचे ?
शास्त्रीय मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला रात्री चंद्र प्रकाशात दूध आटवणे शुभ असते. मात्र यंदा ग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी नैवेद्य तयार करणे योग्य ठरेल. यासोबत सुतक लावण्यापूर्वीच दुधात तुळशीची पाने टाकावीत. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी तयार केलेल दूध चंद्रप्रकाशात ठेवता येते. तथापि या क्रमात हे लक्षात ठेवले पाहिजे की ग्रहण सुरू होण्यापूर्वी दूध तिथून काढून घ्यावे.
 
शरद पौर्णिमा महत्त्व काय?
पौर्णिमा तिथी देवी लक्ष्मीला समर्पित आहे. अशात रात्री लक्ष्मीची योग्यरीत्या पूजा केली पाहिजे.
नोकरी-व्यवसायात यश मिळविण्यासाठी शरद पौर्णिमेला विशेष उपायही केले जातात. पौर्णिमेला लक्ष्मी आणि हनुमान यांच्यासमोर चतुर्मुखी दिवा लावावा.
शास्त्रीय मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला तुळशीची पूजा करणे देखील शुभ असते. अशा वेळी संध्याकाळी तुळशी मातेची पूजा करून तिच्यासमोर दिवा लावावा.
 
चंद्रग्रहणाचा कालावधी किती?
सर्व ज्योतिषी आणि पंचांगांच्या मते 28-29 च्या रात्री होणारे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी रात्री 1:05 वाजता सुरू होईल आणि 2:24 वाजता समाप्त होईल. यात ग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास 19 मिनिटे असेल. या चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:05 पासून सुरू होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

श्रीदत्त क्षेत्र औदुंबर Shri Datta Kshetra Audumbar

दत्त जयंती विशेष रेसिपी : दत्तगुरूंना आवडणारी घेवड्याची भाजी

दत्तमाला कर्णांकित माघ माहात्म्य

श्रीदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामावली श्री दत्तात्रेय 108 नाम

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments