Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय तिसरा

Webdunia
बुधवार, 19 जून 2024 (11:05 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
शिवध्यान करितां जाण ॥ प्राप्त होईल महाज्ञान ॥ तयासी वंदिती सर्वजन ॥ ऐसा महिमा ध्यानाचा ॥१॥
जिरें कुंकुम धान्य शलाखा ॥ काजळ ल्यावयासी देखा ॥ फणि करंडा पोथी काता ॥ ताडपत्र अर्पावें ॥२॥
हे सौभाग्यदायक वाण ॥ द्यावें ब्राह्मणलागुण ॥ शिवशंभु नंदीवहन ॥ अक्षय़ी सौभाग्य देतसे ॥३॥
स्वर्णपक्षा तुज नमस्कार ॥ देई सौभाग्य अपार ॥ रत्नें नेत्र सुंदर कोकिळायै नमस्तुते ॥४॥
प्रवाळमुखि देवी ॥ कस्तुरवर्ण कांतिबर्वी ॥ उत्तम नंदवनाचे ठायीं वास तुझा दयाळे ॥५॥
आम्र चंपक वृक्ष जाण ॥ तेथें अरोहण करुन ॥ कंठसुस्वर गायन ॥ ऐकताचि तुष्टती ॥६॥
चिंतन तुझें केलिया ॥ भक्त सखे नांदती ठाया ॥ धनधान्यादि प्राप्त तया ॥ तुझे प्रसादें करुनी ॥७॥
आवाहन करिता जाण ॥ सौभाग्यासी नसे खंडण ॥ जयजयमाते अज्ञान ॥ दूर माझे करावें ॥८॥
येई सत्वर त्रिभुवनसुंदरी ॥ देव गंधर्व योगी मुनी ॥ सदा सर्वदा तुझे ध्यानीं ॥ असतां भवबंधन नसेची ॥९॥
आसन घेई अंबिके ॥ अनंत कल्याण फलदायके ॥ नमोभक्त वरदायके ॥ देसी मुक्ती दर्शनें करुनी ॥१०॥
धर्मराज म्हणे देवा ॥ व्रतविस्तार सांगावा ॥ सर्वेश्वरा माधवा ॥ श्री केशवा दिनबंधु ॥११॥
श्रीकृष्ण म्हणे ऐक धर्मा ॥ भावयुक्त करावे नेमा ॥ अगाध व्रताचा महिमा ॥ ब्रह्मादिका दुर्लभ ॥१२॥
प्रात:काळी उठोन ॥ करावें श्रीहरीचे स्मरण ॥ आसन गवाळी घेऊन ॥ गंगातीराप्रति जावें ॥१३॥
स्नान झालिया उपरी ॥ भावें अर्चावा त्रिपुरारी ॥ कोकिळेची सेवा करावी ॥ सद्भावे करोनी ॥१४॥
उद्यापन विधी उत्तम ॥ आतां तुज सर्व सांगेन ॥ तो लक्ष लावून ॥ श्रवण त्वां करावें ॥१५॥
करिता भावें उद्यापन ॥ सौभाग्य संपदा वाढेल पूर्ण ॥ अक्षयी शिवपद निर्वाण ॥ प्राप्त होईल सर्वही ॥१६॥
श्रावण शुध्द चतुर्दशी ॥ व्रतोद्यापन आदरेसी ॥ उपवास निश्चयेसी ॥ करावा हो ते काळी ॥१७॥
सर्वतोभद्र भरावे ॥ त्यावरी अष्टद्ळ काढावें ॥ मध्यें कलश स्थापावें ॥ त्यावर ताम्रपात्र ठेवोनी ॥१८॥
त्यावरी प्रतिमा दोन्ही ॥ लक्ष्मीनारायणाची करोनी ॥ संगमें कोकिलादेवी ठेवोनी ॥ अर्चन षोडशोपचारें करावें ॥१९॥
ताडन तापनादि दोष ॥ तेणें मूर्तिचे सत्व भ्रंशे ॥ म्होणोनी ब्राह्मणमंत्र घोषो ॥ शुध्द आधी कराव्या ॥२०॥
मग तया उपरी स्थापुनी ॥ यथासांग पुजन करोनी ॥ जाग्रण करावें हरिकिर्तनी ॥ परम उल्हांसें आवडी ॥२१॥
तदुपरी युग्म भोजन ॥ करावें यथाशक्ति करुनी पूर्ण ॥ वित्त असतां न वंची धन ॥ शिव कोपे तयावरी ॥२२॥
जैसे करील दरिद्री ॥ त्याची न करावी बरोबरी भाव धरोनी अंतरी ॥ आपलें द्रव्य वेचावें ॥२३॥
सत्प धान्याचें सर्वतोभद्र ॥ गोंधुम तंदुळ पवित्र ॥ तीळ मसुरा चणक मात्र ॥ यवादिक मेळवावे ॥२४॥
ऐसें सर्वातोभद्र करावे ॥ मग पुण्याहवाचनी बैसावें ॥ ब्राह्मणासी वैरणी द्यावें ॥ हवन करावें यथासांग ॥२५॥
अष्टोत्तरशात आहुती ॥ वेगळया देवतांच्या निश्चिती ॥ वसोद्वारा पूर्णाहूती ॥ अग्नि तृप्त करावा ॥२६॥
ब्राह्मण करावे परम तृप्त ॥ तेणें संतुष्ट कैलासनाथ ॥ जे जे कामना इच्छीत ॥ त्यासी तैसेचि देतसे ॥२७॥
उपायन छ्त्र चामरें ॥ द्यावीं ब्राह्मणासी आदरें ॥ तेणें करुन कर्पूरगौर सुप्रसन्न होतसे ॥२८॥
आपण इष्टमित्रांसह ॥ भोजन करावें आनंदयुक्त ॥ कपिला धेनु वत्सासहित ॥ कुळगुरुसी अर्पिजे ॥२९॥
ऐसें उद्यापनाचे विधान ॥ झाले असे परिपूर्ण ॥ तरी देव सनातन ॥ पूर्ण कृपा करील ॥३०॥
कुटुंब वत्सल ब्राह्मण ॥ अथवा अग्रीहोत्री जाण ॥ तयासी देतां किंचित दान ॥ अपार पुण्य तयासी होतसे ॥३१॥
ऐसें व्रत हे परम पवित्र ॥ आचारितां उध्दरती सप्त गोत्र ॥ तेणीं आणीक अपार धन प्राप्त ॥ धान्य आणि संतती ॥३२॥
भविष्योत्तर पुराणींचे ॥ महात्म्य असे कोकीळेचें ॥ श्रवणमात्रे जन्माचे ॥ दोष जळती अपार ॥३३॥
इति श्रीभविष्योत्तरपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ तृतीयोऽध्याय गोडहा ॥ ३४॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
 ॥ अध्याय तिसरा समाप्त ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी भात

श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड

Srikshetra Gangapur Yatra दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

श्रीदत्त क्षेत्र औदुंबर Shri Datta Kshetra Audumbar

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments