अति सर्वत्र वर्जावें । तैसेंचि अति प्रेम नसावें । येविषयीं सादर ऐकावें । चरित्र एक अभिनव ॥१॥ जडभरत नामें नृपाळ । राज्य करुनी बहु काळ । छेदूनि वासना समूळ । गेला अंती तपासी ॥२॥ गंडकी नदीच्या तीरीं । आश्रमामाजीं कांतारीं । वैराग्य पावूनि अंतरीं । ईश्वरभजनीं रंगला ॥३॥ आचरण अति...