आतां पुढील अनुसंधान । ऐका तुम्ही सावधान । नारदनीति परम गहन । बोधप्रद अत्यंत ॥१॥ एकदां नारदासी युधिष्ठिर । पुसतसे सादर । सनातन धर्माचे सार । कल्याणाचें निधान जें ॥२॥ धर्मराज म्हणे स्वामी । बहुतां मुखीं ऐकिलें आम्ही । ईशप्राप्ति येचि जन्मीं । वर्ततां वर्णाश्रमधर्मे ॥३॥ तरी प्रतिवर्णाचे धर्म ।...