एकदां नारद ऋषीश्वर । इंद्रलोकीं बोलिले सादर । जैसा पुरुरवा नृप सुंदर । तैसा कोणी दिसेना ॥१॥ तें एकोनि अप्सरा उर्वशी । मोहें इच्छा धरी मानसीं । वरुनि ऐशाचि वरासी । देह सार्थकीं लावीन ॥२॥ मग पुरुरव्यासी भेटोनी । ह्मणे इच्छा उदेली मन्मनीं । अर्पीन काया करग्रहणीं । तुझिया हातीं...