Mahalaxmi Strotam: महालक्ष्मी स्तोत्र हे इंद्र उचाव या नावाने देखील ओळखलं जातं. महालक्ष्मी स्तोत्राची रचना देव राज इंद्र यांनी केली असल्याचे मानले जाते. या स्तोत्राचे पठण इंद्रांनी महालक्ष्मीकडून ऐश्वर्य प्राप्तीसाठी केलं होतं. यामुळे महालक्ष्मी देवीने प्रसन्न होऊन त्यांची इच्छा पूर्ण केली. असे म्हणतात की जो व्यक्ती देवी महालक्ष्मीच्या या स्तोत्राचा भक्तिभावाने पाठ करतो. त्याला महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यातून दु:ख दूर होते. त्याला संपत्तीची कमतरता राहत नाही. जर तुम्हालाही महालक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर या स्तोत्राचा पाठ अवश्य करा. चला तर मग महालक्ष्मी स्तोत्राचे पठण करूया -
श्रीगुरूभ्यो नमः
श्री शुभ श्री लाभ श्री गणेशाय नमः
श्री महालक्ष्म्यष्टकम् स्तोत्रम्
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।1।।
नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि।
सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।2।।
सर्वज्ञे सर्ववरदे देवी सर्वदुष्टभयंकरि।
सर्वदु:खहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।3।।
सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि।
मन्त्रपूते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।4।।
आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि।
योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।5।।
स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे।
महापापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।6।।
पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी।
परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।7।।
श्वेताम्बरधरे देवि नानालंकारभूषिते।
जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।8।।
महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं य: पठेद्भक्तिमान्नर:।
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा।।9।।
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम्।
द्विकालं य: पठेन्नित्यं धन्यधान्यसमन्वित:।।10।।
त्रिकालं य: पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम्।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा।।11।।
।।इति महालक्ष्मी स्तोत्र पाठ समाप्त।।
महालक्ष्मी स्तोत्राचे लाभ
महालक्ष्मीच्या या स्तोत्राचे पठण केल्याने साधकाच्या जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. जेव्हा दुर्वास ऋषींच्या शापामुळे तिन्ही लोक हीन झाले. त्यानंतर देवराज इंद्रासह सर्व देवांनी या स्तोत्राचे पठण करून महालक्ष्मीला प्रसन्न केले, त्यानंतर पुन्हा एकदा महालक्ष्मीच्या कृपेने त्रिलोक लक्ष्मीने भरले. देवांना लक्ष्मीची प्राप्ती झाली. तेव्हापासून असे मानले जाते की जो या स्तोत्राचा यथायोग्य पठण करतो त्याला श्रींची कृपा प्राप्त होते. तुम्हालाही संपत्ती हवी असेल तर रोज या स्तोत्राचा पाठ करावा.
महालक्ष्मी स्तोत्र पाठ विधी
महालक्ष्मी स्तोत्र पठण करण्याची कोणतीही विशेष विधी नाही. साधारण आपण ज्याप्रकारे दररोज पूजा करतो त्याप्रमाणे महालक्ष्मी स्तोत्र पाठ विधी करावा. नित्यदिनाप्रमाणे शुद्ध होऊन सर्वातआधी श्री गणेशाची आराधना करावी. कारण गणेश प्रथम पूजनीय असून विघ्नहर्ता आहे. असे केल्याने आपल्या उपासनेत कोणतेही अडथळे येणार नाही. गणेश स्तुतीनंतर महालक्ष्मी स्तोत्र पाठ करावा. याने आपली सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकेल. आपण महालक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीवर कमळ पुष्प अर्पित करावं.