Margashirsha Guruvar यंदा मार्गशीर्ष लक्ष्मीपूजन 14 डिसेंबर 2023 गुरुवारपासून सुरू झाले असून पाचवा गुरुवार 11 जानेवारीला आहे. मात्र पाचव्या गुरुवारी अमावस्या येत असल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करावे असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
11 जानेवारी रोजी मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्येला सुरुवात होत आहे आणि गुरुवारी सूर्याने बघितलेली तिथी असल्यामुळे या दिवशी उद्यापन करायला हरकत नाही. अमावस्या आणि लक्ष्मीपूजा हा योग दिवाळीला साजरा केला जातो त्यामुळे अमावस्या तिथीची या व्रताला अडसर नाही. अशात कुठलीही शंका न बाळगता 11 जानेवारी रोजी उद्यापन करणे योग्य ठरेल.
मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करावे
मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन संपूर्ण विधी
मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करुन पूजा केली जाते. पूजेप्रमाणेच याचे विसर्जन उद्यापन करण्याची देखील विधी आहे. अशात तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडली असेल तर उद्यापन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या-
पवित्र मार्गशीष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. मार्गशीष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर करतात.
शेवटच्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणे पुजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी.