suvichar

अध्यात्म म्हणजे काय ?

Webdunia
* अध्यात्म म्हणजे ईश्वराने माणूस म्हणून जन्म दिला आहे तर, माणसाने माणसांशी माणसांसारखे वागणे आणि, आपली नैतिक जबाबदारी पार पाडणे.
* अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.
* अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.
* अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव असणे.
* अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये अस वागणं.
* अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे. 
* अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.
* अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.
* अध्यात्म म्हणजे मुक्या पशू-पक्ष्यांवर देखील प्रेम करणे.
* अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करणे.
* अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव ठेवणे.
* अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थभाव असणे.
* अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.
* अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सतभावाने राहणे.
* अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.
* अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता असणे.
* अध्यात्म म्हणजे गरजवंतांना यथा शक्ती मदत करणे.
* अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव असणे.
* अध्यात्म म्हणजे साधं, सोपं, सरळ आणि निर्मळ असणं, दिसणं, आणि वागणं.
* अध्यात्म म्हणजे फक्त पूजा, अर्चना, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर, अध्यात्म म्हणजे केलेली पूजा, अर्चना, प्रार्थना आणि भक्ती याप्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.
* अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.
* थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने करणे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shani Jayanti 2026 : नशीब उजळण्यासाठी शनी जयंती आणि वट सावित्री अमावस्येच्या दिवशी हे सोपे उपाय करा

Shani Jayanti 2026 शनैश्चर जयंतीला या पदार्थांचे सेवन मुळीच करू नये

Mahalakshmi Mantra देवी लक्ष्मीचे ६ चमत्कारी मंत्र: संपत्ती, समृद्धी आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी अचूक उपाय

आरती शुक्रवारची

सावधान! विवाहित पुरुषांनी 'या' ७ गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नयेत, अन्यथा तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल!

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments