Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 11 April 2025
webdunia

पौर्णिमाचे उपाय

purnima upay
, सोमवार, 21 जानेवारी 2019 (15:19 IST)
पौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो.  शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष प्रभाव असतो. तसेच हा दिवस लक्ष्मीला देखील विशेष प्रिय असतो. पौर्णिमाच्या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे विशेष आणि शीघ्र प्रभाव दिसून येतात. शास्त्रानुसार पोर्णिमाच्या दिवशी करण्यासाठी बरेच उपाय आणि तोटके सांगण्यात आले आहे. तर जाणून घेऊ असेच काही उपाय –
 
 
1. शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमाच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होत. म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्य कामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील.  
 
2. पौर्णिमाच्या रात्री घरात महालक्ष्मीसोबत विष्णूची देखील पूजा करावी. पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करवली तर जास्त योग्य फळ मिळतात.  
 
3. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून लक्ष्मीला दाखवायला पाहिजे नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे ज्याने धनाच्या आगमनाचे मार्ग खुलून जातात.  
 
4. पौर्णिमाच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा.  
 
5. जर तुम्हाला तुमचे दांपत्य जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे.  
 
6 प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री 15 ते 20 मिनिट चंद्राककडे एकटक लावून बघितल्याने जातकाच्या डोळ्यांची ज्योत वाढते.  
 
7. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते. 
 
8. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ॐ आणि स्वस्तिक काढायला पाहिजे.  
 
9. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ॐ रुद्राय नमः मंत्राच जप करा.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव