Marathi Biodata Maker

पंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (12:37 IST)
पंचक : यावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग पंचक, मंगळवारी अग्नी पंचक, शुक्रवारी चोर पंचक, शनिवारी पडणार्याक पंचकांना मृत्यू पंच म्हणतात. याशिवाय धनिष्ठा नक्षत्रात आगीची भीती आहे. सताभिषा नक्षत्रात मतभेद होण्याची शक्यता आहे. पूर्वाभद्रपद नक्षत्रात आजार होण्याची शक्यता आहे. उत्तरा भाद्रपदात पैशांच्या रूपात शिक्षा असून रेवती नक्षत्रात पैशाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
 
राज पंचक: सोमवारापासून सुरू होणार्यान पंचकाला राज पंच म्हणतात. हा पंचक शुभ मानला जातो आणि विश्वासानुसार पाच दिवसांत कामांमध्ये यश मिळते, विशेषत: सरकारी कामात यश मिळते, तसेच मालमत्तेशी संबंधित कामही शुभ असते.
 
नक्षत्रांचा प्रभाव आणि पंचकाच्या दरम्यान कोणते 5 काम करणे निषेध आहे -
 
1. पंचकात जेव्हा घनिष्ठा नक्षत्र असेल तेव्हा गवत, लाकूड इत्यादी इंधन एकत्रित नाही करायला पाहिजे, याने अग्नीची भिती असते.  
2. पंचकाच्या दरम्यान दक्षिण दिशेत प्रवास करणे टाळावे, कारण दक्षिण दिशा, यमाची दिशा असते. या नक्षत्रांमध्ये प्रवास करणे धोकादायक ठरू शकते.  
3. पंचकात जेव्हा रेवती नक्षत्र सुरू असेल त्या वेळेस घराची छत नाही टाकायला पाहिजे, असे विद्वानांचे मत आहे. यामुळे धन हानी आणि  घरात क्लेश होतो.  
4. पंचकात पलंग तयार करणे देखील अशुभ मानले जाते. विद्वानांनुसार असे केल्याने फार मोठ्या संकट समोर येण्याची शक्यता आहे.  
5. पंचकात शवाचे अंतिम संस्कार करण्याअगोदर एखाद्या योग्य ब्राह्मणाचा सल्ला घ्यायला पाहिजे. जर असे नाही केले तर शवासोबत पाच पुतळे कणकेचे किंवा कुश (एक प्रकारचे गवत)ने बनवून अर्थीवर ठेवायला पाहिजे आणि या पाचींचे शवाप्रमाणे पूर्ण विधीने अंतिम संस्कार करायला पाहिजे, तेव्हा पंचक दोष समाप्त होतो. असे गरूड पुराणात लिहिले आहे.
 
1. रोग पंचक
रविवारी सुरू होणारा पंचक रोग पंचक असतो. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. या पंचकात कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करणे वर्जित असते. शुभ कार्यांमध्ये हे पंचक अशुभ मानले जाते.  
 
2. राज पंचक
सोमवारी सुरू होणार्या  पंचकाला राज पंचक म्हणतात. हे पंचक शुभ मानले जाते. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये सरकारी कामांमध्ये यश मिळतो. राज पंचकात संपत्तीशी निगडित कार्य करणे शुभ मानले जाते. 
 
3. अग्नी पंचक
मंगळवारी सुरू होणार्यात पंचकाला अग्नी पंचक म्हणतात. या पाच दिवसांमध्ये कोर्ट कचेरी निर्णय, आपले हक्क मिळवण्याचे काम केले जातात. या पंचकात अग्नीचा भय असतो. हे अशुभ असते. या पंचकात कुठल्याही प्रकारचे निर्माण कार्य, औजार आणि मशीनरी कामांची सुरुवात करणे अशुभ मानले जाते. यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.  
 
4. चोर पंचक
शुक्रवारी सुरू होणारा पंचक चोर पंचक असतो. ज्योतिषांप्रमाणे या पंचकात प्रवास करण्याची मनाई असते. या पंचकात घेवाण-देवाण,  व्यापार आणि कुठल्याही प्रकारचे सौदे नाही करायला पाहिजे. आणि जर कार्य तुमच्या हाताने केले गेले तर धन हानी होणे निश्चित असते.  
 
5. मृत्यू पंचक
शनिवारी सुरू होणार्याज पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात. नावाने ओळखले जाते की अशुभ दिवसापासून सुरू होणारे हे पंचक मृत्यूसमान त्रास देण्यासारखा असतो. या पाच दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे जोखीमपूर्ण काम नाही करायला पाहिजे. याच्या प्रभावामुळे विवाद, अपघात इत्यादी होण्याचा धोका असतो. 
 
6. त्याशिवाय बुधवार आणि गुरुवारी सुरू होणार्या पंचकात वर दिलेल्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे नसते. या दोन दिवसांमध्ये सुरू होणार्यात पंचकांमध्ये पंचकाचे पाच कामाशिवाय बाकी सर्व शुभ काम करू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मकर संक्रांती 2026 मुहूर्त, पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, आरती

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

मंगळवारी हनुमान चालीसा पठण किती वेळा करावे?

Bhogi 2026 Wishes in Marathi भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments